हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मोताळा हादरला! मलकापूर रोडवरील भीषण अपघातात 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

On: February 26, 2026 1:38 PM
Follow Us:
मोताळा मलकापूर रोडवरील अपघाताचे ठिकाण

मोताळा |बुलढाणा |२६ फेब्रुवारी २०२६ :

बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात बुधवारी (२५ फेब्रुवारी) सकाळी घडलेल्या भीषण अपघातात एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मलकापूर रोड अपघात बुलढाणा-मलकापूर मार्गावरील सांगळद शिवारात पेट्रोल पंपाजवळ सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत व्यक्तीचे नाव शिवदास समाधान कांडेलकर (वय ४५), रा. बोऱाखेडी, ता. मोताळा असे आहे. अपघातानंतर नातेवाईकांनी त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालय मोताळा येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

या घटनेची माहिती डॉ. धीरज विक्रम म्हस्के (वय ४०) यांच्या मार्फत कक्षसेवक पुरुषोत्तम बाबुराव मार्वे (वय ५४) यांनी बोऱाखेडी पोलीस पोस्टेला दिली. मिळालेल्या अहवालावरून पोलीसांनी मर्ग क्रमांक १५/२०२६ कलम १९४ बीएनएस अन्वये नोंद केली आहे.

पुढील तपास पोलीस अधिकारी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.

मयत शिवदास कांडेलकर हे पत्नीसमवेत बोऱाखेडी येथे राहत होते. त्यांच्या अकाली निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.


👉 संबंधित बातम्या


📢 आपल्या भागातील ताज्या बातम्यांसाठी

स्थानिक, गुन्हेगारी, शेती, राजकीय आणि ब्रेकिंग बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.

 

प्रवीण गरुडे

प्रवीण गरुडे हे Kattanews.in चे अनुभवी प्रतिनिधी असून ग्रामीण, सामाजिक, शिक्षण आणि स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांचे अचूक व विश्वासार्ह वार्तांकन करतात. प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीवर आधारित बातम्या सादर करणे ही त्यांची ओळख आहे. सामान्य नागरिकांचे प्रश्न, ग्रामीण भागातील समस्या आणि सार्वजनिक हिताचे विषय प्रभावीपणे मांडण्यावर त्यांचा विशेष भर असतो. सत्यता, वेग आणि जबाबदारी या पत्रकारितेच्या मूल्यांना प्राधान्य देत ते सातत्याने वाचकांपर्यंत बातम्या पोहोचवत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

साखरखेर्डा ग्रामसभेत क्रीडांगणासाठी सरकारी जमीन राखीव ठेवण्याचा एकमुखी ठराव मंजूर

साखरखेर्डा मधील क्रीडांगणावर अखेर शिक्कामोर्तब! ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर; युवकांनी फटाके फोडून केला जल्लोष

₹25 हजारांची लाच घेताना पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप मोरे ACB च्या जाळ्यात

₹25 हजारांची लाच घेताना पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप मोरे ACB च्या जाळ्यात; विकासकामांच्या बिलासाठी मागितले होते 3% कमिशन

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीचे पोलीस शिपाई चंद्रनिलकांत सोनुने यांनी मुंबईतील 80 वर्षीय महिलेला मदत केल्यानंतर त्यांचा गौरव करण्यात आला.

मुंबईत 80 वर्षीय आजीला दिला आधार; चिखलीच्या पोलीस शिपाई चंद्रनिलकांत सोनुने यांच्या माणुसकीची सर्वत्र चर्चा

बुलढाण्यात एसटी स्थानकाच्या 200 मीटर परिसरात RTO आणि पोलिसांची वाहन जप्ती कारवाई

एसटी स्थानकाच्या 200 मीटरमध्ये वाहन लावलं? थेट जप्ती; बुलढाण्यात RTO-पोलिसांची धडक कारवाई, 270 वाहनांवर Action

सिंदखेडराजा येथे SIR प्रक्रियेच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे

SIR कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही; सिंदखेडराजात जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांचा कडक इशारा

देऊळगाव राजात SC आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात काढण्यात आलेला विराट जनआक्रोश मोर्चा

देऊळगाव राजात SC आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात विराट जनआक्रोश; हजारोंचा मोर्चा, सरकारसमोर ७ प्रमुख मागण्या

Leave a Comment