बुलढाणा प्रतिनिधी/भागवत गायकवाड
बुलढाणा जिल्ह्यात पूर्णा नदी अवैध वाळू वाहतूक प्रकरणाने पुन्हा एकदा प्रशासनाला सतर्क केले आहे.
मोठा धक्का दिला आहे. मलकापूर तालुक्यातील नरवेल परिसरात
पूर्णा नदी अवैध वाळू वाहतूक करत असलेले ८ टिप्पर रंगेहाथ पकडण्यात आले.
या कारवाईत पूर्णा नदी अवैध वाळू वाहतूक प्रकरणातील सुमारे १ कोटी ६२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या आदेशानुसार आणि उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने ही धडक कारवाई केली.
दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी एमआयडीसी मलकापूर पोलीस स्टेशन हद्दीतील नरवेल कोटेश्वर मंदिर शिवारात
पेट्रोलिंगदरम्यान जमुनापुरी घाटातून अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती.
माहितीच्या आधारे नाकाबंदी करण्यात आली असता संशयास्पद ८ टिप्पर वाहने थांबवण्यात आली.
तपासणीदरम्यान चालकांकडे वाळू वाहतुकीसाठी कोणतीही वैध परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले.
पंचासमक्ष तपासणीमध्ये प्रत्येकी सुमारे २ ब्रॉस वाळूप्रमाणे एकूण १६ ब्रॉस वाळू (अंदाजे किंमत २ लाख रुपये)
आणि प्रत्येकी सुमारे २० लाख रुपये किमतीची ८ टिप्पर वाहने जप्त करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस स्टेशन एमआयडीसी मलकापूर येथे गुन्हा अप. क्र. १७५/२०२५ अन्वये
भा.न्या.सं. कलम ३०३(२) तसेच गौण खनिज अधिनियम २१(१), २१(२) अंतर्गत
८ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये मलकापूर, नांदुरा व मोताळा येथील व्यक्तींचा समावेश आहे.
जप्त टिप्पर वाहनांचे क्रमांक MH-28-BB-6174, 2895, 4414, 4172, 1210, 8910, 7935 व 7397 असे आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत असून, अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात
यापुढेही कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
👉 अशीच ताज्या व विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in फॉलो करा.
हे पण वाचा…
- चारित्र्याच्या संशयातून राक्षसी कृत्य! मेहकरमध्ये झोपेत असलेल्या पत्नी व 4 वर्षांच्या चिमुकल्याचा कुऱ्हाडीने निर्घृण खून.
- समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारमधील तीन जण गंभीर जखमी.
- मेहकर नगरपालिकेत ‘सत्तासंघर्ष’ पेटला; सत्कार सोहळ्यावरून काँग्रेस-शिंदेसेनेची नाराजी.











