साखरखेर्डा (वार्ताहर) | १२ मार्च २०२६
जमीन महसूल थकबाकीच्या वसुलीसाठी प्रशासनाने मोठी कारवाई करत मौजे किनगावराजा (ता. सिंदखेडराजा) येथील गट क्रमांक 785 मधील मालमत्तेचे समपहरण केले असून सदर मालमत्तेचा जाहीर लिलाव 17 मार्च 2026 रोजी तहसील कार्यालय सिंदखेडराजा येथे होणार आहे.
कसूरदार सचिव, कृषि उत्पन्न बाजार समिती सिंदखेडराजा यांच्याकडून येणे असलेल्या जमीन महसूल थकबाकीच्या वसुलीसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. मौजे किनगावराजा येथील गट क्रमांक 785 क्षेत्रफळ 0.82 हेक्टर आर. आणि आकार रुपये 7.50 असलेली मालमत्ता प्रशासनाने जप्त केली आहे.
निश्चित करण्यात आलेल्या दिवसापूर्वी संबंधित देय रक्कम भरली गेली नाही तर सदर मालमत्ता तिच्यावर असलेल्या सर्व भार, अनुदाने व संविदांपासून मुक्त करून जाहीर लिलावाद्वारे विक्रीस काढण्यात येणार आहे.
हा जाहीर लिलाव तहसील कार्यालय सिंदखेडराजा, जि. बुलढाणा येथे 17 मार्च 2026 रोजी दुपारी 2 वाजता किंवा त्यानंतर घेण्यात येणार आहे. इच्छुक नागरिकांनी नमूद दिनांक व वेळेस तहसील कार्यालयात उपस्थित राहून लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार सिंदखेडराजा यांनी केले आहे.
दरम्यान, सदर प्रकरण तत्कालीन सचिव हरिभाऊ कोल्हे यांच्या कारकिर्दीत घडल्याची माहिती सभापती अनिल तुपकर यांनी दिली आहे. त्या काळात काही कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याचेही समोर आले होते. वेतन मिळण्यासाठी संबंधितांनी न्यायालयात प्रकरण दाखल केले असल्याची माहितीही समोर आली आहे.
Related News
- देशभरात ESMA लागू! आता गॅस सिलिंडर बुकिंगचे नियम बदलले; 21 नाही तर ‘इतक्या’ दिवसांनीच मिळणार सिलिंडर
- मोठी अपडेट! सरकारी नोकरभरती परीक्षांचे शुल्क 50% करण्याची मागणी; लाखो विद्यार्थ्यांना मिळू शकतो दिलासा
- चिखली तालुक्यात धक्कादायक घटना! शॉर्टसर्किटमुळे गव्हाच्या शेताला आग; शेतकऱ्यांच्या धाडसामुळे वाचला 30 एकर पिकाचा पट्टा
आवश्यक करा:
आपल्या परिसरातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.










