हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

पिंप्री गवळीत काळजाला चटका! घरातच १५ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

On: January 1, 2026 5:18 PM
Follow Us:
पिंप्री गवळी येथे घरातच १५ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्येची घटना
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन
खामगाव/प्रतिभा जगदने 
पिंप्री गवळी तरुणी आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. पिंप्री गवळी तरुणी आत्महत्या ही घटना २९ डिसेंबरच्या रात्री घडली असून घरातच १५ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. पिंप्री गवळी तरुणी आत्महत्या प्रकरणामुळे गावात शोककळा पसरली आहे.

पिंप्री गवळी ता. खामगाव येथील रामदास गोपाल लोखंडे यांचे घर शेतामध्ये असून ते कुटुंबासह तेथेच वास्तव्यास आहेत. २९ डिसेंबर रोजी कुटुंबातील सदस्य घराबाहेर झोपले होते, तर त्यांची मुलगी कु. शृती नितीन लोखंडे (वय १५) ही घरात एकटी झोपली होती.

सकाळी रामदास लोखंडे यांनी घरातील किचनचा दरवाजा उघडून आत पाहिले असता कु. शृती ही टिनपत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. ही दृश्य पाहताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, सदर मृत्यूबाबत कुणावरही संशय नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी कलम १९४ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

👉 महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी

Kattanews.in – महाराष्ट्राची नंबर 1 डिजिटल न्यूज वेबसाईट फॉलो करा.

हे पण वाचा..

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Mehkar Hotel Ekant police raid sex racket two women rescued

मेहकर बायपासवरील ‘हॉटेल एकांत’मध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात दोन महिलांची सुटका

मोहाडी शिवारात बिबट्याचा हल्ला, नीलगाई जखमी

मोहाडी शिवारात बिबट्याचा थरार! नीलगाईवर हल्ला; मादी बिबट्या व दोन पिल्लांचा वावर

Leave a Comment