हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

शेतकरी योद्धा कृती समितीचा पहिला विजय! देवानंद सोसे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध

Follow Us:
पळसखेड चक्का येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवानंद सोसे
पळसखेड चक्का |प्रा.दिलीप नाईकवाड

शेतकरी योद्धा कृती समितीने आता शैक्षणिक क्षेत्रातही आपले पहिले पाऊल टाकले आहे. पळसखेड चक्का येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी समितीचे संस्थापक सदस्य देवानंद विष्णू सोसे यांची बिनविरोध निवड झाली. तर रूपालीताई संदीप मुंढे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

निवड होताच नवनिर्वाचित समितीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात करत शाळा परिसरातील घाणीचे साम्राज्य जेसीबीच्या साहाय्याने हटवून स्वच्छता केली. त्यामुळे पदाची जबाबदारी स्वीकारताच कामाला सुरुवात करणाऱ्या समितीची ही पहिलीच ठोस कृती ठरली आहे.

पळसखेड चक्का गावातील दोन वस्त्यांमधून अनेक विद्यार्थी दररोज शाळेत ये-जा करतात. विद्यार्थ्यांना मुंबई–नागपूर महामार्गालगतून प्रवास करावा लागतो. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन रस्त्याच्या कडेला वाढलेले मोठमोठे गवत आणि झुडपेही जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आली.

शाळा परिसराची स्वच्छता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी निवडीनंतर लगेचच काम सुरू झाल्याने पालक व ग्रामस्थांकडून या उपक्रमाचे स्वागत होत आहे. शाळेतील स्वच्छता, मूलभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसोबतच शैक्षणिक प्रगतीसाठीही समितीच्या माध्यमातून प्रभावी काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या शेतकरी योद्धा कृती समितीचे शैक्षणिक क्षेत्रातील हे पहिले पाऊल मानले जात आहे. देवानंद सोसे यांच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून शाळेच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा पालक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली.

शाळा व्यवस्थापन समितीच्या निवड प्रक्रियेत अध्यक्षपदी देवानंद विष्णू सोसे, तर उपाध्यक्षपदी रूपालीताई संदीप मुंढे यांची बिनविरोध निवड झाली.

समितीच्या सदस्यांमध्ये पल्लवीताई गोपाल धायतडक, प्रवीण सुखदेव जाधव, वर्षाताई श्रीकृष्ण मुंढे, संजीवनी सचिन मुंढे, रामेश्वर दिनकर मुंडे, एकनाथ प्रल्हाद काकड आणि शिवकन्या पांडुरंग सोसे यांचा समावेश आहे.

नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांचे पालक, ग्रामस्थ, शिक्षक तसेच शेतकरी योद्धा कृती समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.

📲 ताज्या स्थानिक बातम्यांसाठी WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा

बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.


Join WhatsApp Group

📢 बातमी आवडली?

ही बातमी आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा आणि अशाच ताज्या स्थानिक बातम्यांसाठी KattaNews ला नियमित भेट द्या.

प्रा. दिलीप नाईकवाड

प्रा. दिलीप नाईकवाड हे Katta News साठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून बातम्या देतात. ते राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैचारिक विषयांवर वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक लेखन करतात. ते मागील 15+ वर्षांपासून शिक्षण व वैचारिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment