दिवाळी जाहिरात बुकिंग - KattaNews.in
📢 KattaNews.in जाहिरात सेवा
आपल्या व्यवसायाची जाहिरात आजच द्या!
लाखो लोकांपर्यंत पोहोचवा!
दुकाने • हॉस्पिटल • क्लासेस • हॉटेल • स्थानिक व्यवसाय
✅ जाहिरातीसाठी WhatsApp वर संपर्क करा
KattaNews.in
KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात सेवा
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

पळसखेड चक्का येथे महाजल योजनेचा फज्जा! नळ कोरडे, महिलांची पाण्यासाठी वणवण

On: March 2, 2026 8:49 AM
Follow Us:
पळसखेड चक्का येथे महाजल योजना ठप्प झाल्याने कोरडे नळ आणि पाण्यासाठी महिलांची भटकंती

सिंदखेडराजा |२ मार्च २०२६

पळसखेड चक्का महाजल योजना ठप्प झाल्याने संपूर्ण गावात तीव्र पाणी समस्या निर्माण झाली आहे. महाजल योजना असूनही नळांना पाणी येत नसल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथे लाखो रुपयांचा निधी खर्चून उभारलेली महाजल योजना सध्या पूर्णपणे कोलमडली असून नियमित पाणीपुरवठा बंद पडल्याची गंभीर परिस्थिती आहे. महिलांना व नागरिकांना पाण्यासाठी विहीर, बोअरवेल आणि इतर ठिकाणी भटकंती करावी लागत आहे.

गावातील नळांना अनेक दिवसांपासून पाणी येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. महाजल योजनेअंतर्गत उभारलेली पाईपलाईन, मोटार व पाण्याची टाकी यांची योग्य देखभाल होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. लाखो रुपये खर्चूनही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिक प्रशासनावर संताप व्यक्त करत आहेत.

गावकऱ्यांनी लवकरात लवकर महाजल योजना सुरळीत सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


📢 तुमच्या गावातही अशीच पाणी समस्या आहे का?

तुमच्या परिसरातील समस्या आम्हाला कळवा. Kattanews.in तुमचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवेल.


🔎 Related News

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

बुलढाणा जिल्हा परिषद लाचप्रकरण ACB कारवाई

बुलढाणा जिल्हा परिषदेत ACB ची धडक कारवाई; लाच मागितल्याच्या आरोपावरून तांदूळकर आणि खर्चे या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई

देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ आणि अंढेरा परिसरातील धरणांवरील पाणी उपशाच्या तपासणीची मागणी

देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ, अंढेरा परिसरातील धरणांवर पाणी उपशाचे नियंत्रण कोण ठेवणार? भरारी पथकाच्या तपासणीची मागणी

शिंदी सरकारी एफ-क्लास जमीन प्रकरणात तत्कालीन ग्रामसेवकाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

शिंदी सरकारी जमीन प्रकरणात मोठी घडामोड! तत्कालीन ग्रामसेवकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

देऊळगाव राजा बालाजी महाराज मंदिरात मंगळसूत्र चोरीची घटना

देऊळगाव राजा येथील बालाजी मंदिरात गर्दीचा फायदा घेत महिलेचे मंगळसूत्र लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

साखरखेर्डा महिलेवर हल्ला करणाऱ्या आरोपीला नागरिकांनी पकडले

साखरखेर्ड्यात भरदिवसा महिलेच्या घरात घुसून गळा दाबण्याचा प्रयत्न; आरडाओरड ऐकून नागरिकांनी आरोपीला पकडले

साखरखेर्डा तालुका मागणीवर बोलताना माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगण

‘शासनाचं आवतन म्हणजे जेवण वाढल्याशिवाय खरं नाही’; साखरखेर्डा तालुका मागणीवर डॉ. राजेंद्र शिंगणे स्पष्टच बोलले

Leave a comment