बुलढाणा|५ मार्च २०२६
मृत राहुल बाजड हे मूळचे मेहकर तालुक्यातील बेलगाव येथील रहिवासी होते. ते सध्या वाशीम जिल्ह्यातील केनवड येथे ‘आपल कलेक्शन’ नावाचे कापड दुकान चालवत होते. मागील काही वर्षांपासून ते जाम आढाव येथे मामाच्या घरी वास्तव्यास होते.
३ मार्च रोजी अज्ञात आरोपीने मेहकर खंडाळा परिसरातील MIDC भागात त्यांचा चेहरा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना ४ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
मेहकर पोलीस ठाण्याचे अधिकारी व तपास पथक घटनास्थळी दाखल झाले असून फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक तपासात ही हत्या प्रेमसंबंधातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरी अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
या Mehkar MIDC murder प्रकरणामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. औद्योगिक क्षेत्रात अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले असून लवकरच मोठा खुलासा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, राहुल बाजड यांच्या निधनामुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतरच या हत्येमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
📢 Related News
👉 आमच्याशी कनेक्ट रहा
अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि जलद अपडेटसाठी Kattanews.in नियमित वाचा.
📲 आमच्या WhatsApp चॅनलला जॉइन करा.
🔔 नोटिफिकेशन ऑन करून ब्रेकिंग न्यूज सर्वात आधी मिळवा.











