हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

सिंदखेड राजात आनंद राजपूत यांचा ‘षटकार’! विदर्भ तलाठी संघात सलग सहाव्यांदा बिनविरोध तालुका अध्यक्ष

On: March 4, 2026 9:26 AM
Follow Us:
आनंदसिंग राजपूत विदर्भ तलाठी संघ सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष निवड 2026

सिंदखेड राजा (बुलढाणा) |४ मार्च २०२६ :

विदर्भ तलाठी संघ, नागपूर-२ उपविभाग शाखा सिंदखेड राजाची वार्षिक आमसभा २८ फेब्रुवारी २०२६ रोजी जिजाऊ सृष्टी येथे उत्साहात पार पडली. या वार्षिक सभेत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे आनंदसिंग राजपूत यांची सलग सहाव्यांदा बिनविरोध तालुका अध्यक्षपदी निवड. महसूल विभागातील कर्मचारी संघटनांमध्ये सातत्य, विश्वास आणि नेतृत्व या बाबतीत राजपूत यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

संघटनेतील कामाचा दांडगा अनुभव, तलाठी बांधवांशी असलेला जवळचा संवाद आणि न्याय्य हक्कांसाठी सातत्याने घेतलेली भूमिका यामुळे उपस्थितांनी त्यांच्या निवडीचे स्वागत करत “संघटनेच्या मैदानात राजपूत यांचा षटकार” अशा शब्दांत गौरव केला.

उपविभाग सिंदखेड राजाचे मावळते अध्यक्ष पंढरीनाथ जायभाये यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत सन २०२६-२७ या वर्षासाठी नवीन उपविभागीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये शिवानंद सानप यांची अध्यक्षपदी, हांडे साहेब यांची उपाध्यक्षपदी तर वसुदेव जायभाये यांची सचिवपदी सर्वानुमते निवड झाली.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

सिंदखेड राजा तालुका कार्यकारिणीत आनंदसिंग राजपूत यांच्यासह श्रीमती अंजना गिरणारे (उपाध्यक्ष) आणि विलास कटारे (सचिव) यांची निवड जाहीर करण्यात आली. देऊळगाव राजा तालुका कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी संजय बरांडे, उपाध्यक्षपदी तेजस शेटे आणि सचिवपदी सुमित जाधव यांची निवड करण्यात आली.

या सभेला जिल्हाध्यक्ष विजेंद्रजी धोंडगे, जिल्हा सचिव शिवानंदजी वाकदकर, माजी जिल्हा सचिव राजे भागवत जाधव आणि माजी तालुका अध्यक्ष गजानन सांगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात तलाठी संवर्गाच्या प्रलंबित मागण्या, वेतनविषयक प्रश्न आणि महसूल विभागातील कामकाज सुधारण्यासाठी संघटना अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनियुक्त सचिव वसुदेव जायभाये यांनी केले. उपविभागातील सर्व आजी-माजी पदाधिकारी व तलाठी बांधवांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.


👉 अधिक स्थानिक आणि ब्रेकिंग बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट द्या.आमच्या बातम्या पाहण्यासाठी वेबसाईट नियमित वाचा आणि शेअर करा.


Related News

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

बुलढाण्यात धाड पोलिसांनी 41 क्विंटल 63 किलो सरकारी रेशनचा तांदूळ आणि आयशर वाहन जप्त करत मोठी कारवाई केली.

गरीबांच्या ताटातील घास लुटण्याचा प्रयत्न? बुलढाण्यात 41 क्विंटल सरकारी रेशनचा तांदूळ जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

चिखली पोलिसांची मोठी कारवाई, MPDA अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध आणि दोघांना तडीपार

चिखली पोलिसांची मोठी कारवाई! MPDA अंतर्गत सराईत गुन्हेगार 1 वर्षासाठी स्थानबद्ध, दोघांना 3 महिन्यांसाठी तडीपार

बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणी मध्य प्रदेशातील कंपनीवर बुलढाण्यात गुन्हा दाखल

बोगस सोयाबीन बियाण्यांवर मोठी कारवाई! मध्य प्रदेशातील कंपनीवर गुन्हा; हजारो शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची मागणी

बुलढाणा शहरातील 132 KV विद्युत टॉवर परिसरातील घटनेनंतर तपास करत असलेले पोलीस

बुलढाणा हादरलं! 132 KV विद्युत टॉवर परिसरात 29 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू

भास्करराव शिंगणे विद्यालयात विद्यार्थिनींना सायकल वाटप करताना मान्यवर

भास्करराव शिंगणे विद्यालयात विद्यार्थिनींना सायकल वाटप; शिक्षणाला मिळाले नवे बळ

बुलढाणा एसटी विभागाने ४६ कोटींची विक्रमी उत्पन्नवाढ करत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला

बुलढाणा एसटी विभागाची राज्यात नंबर-1 कामगिरी; एका वर्षात तब्बल ४६ कोटींची विक्रमी उत्पन्नवाढ

Leave a Comment