प्रा.दिलीप नाईकवाड/बुलढाणा जिल्हा
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर-लोणार मतदारसंघात उबाठा शिवसेना आणि काँग्रेस पक्षांनी आपली राजकीय ताकद सिद्ध केली असून राज्यात सत्ता असतानाही शिवसेना शिंदे गटाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मेहकर नगरपालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे किशोर गारोळे नगराध्यक्षपदी निवडून आल्याने स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात झाली आहे.
मेहकरमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांना मागील विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी होती. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दोन्ही नगरपालिका शिंदे गटाच्या हातातून गेल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. मतदारांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेवर विश्वास दाखवला आहे.
लोणार नगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या पाहता काँग्रेसचे ९, शिंदे शिवसेनेचे ४, भाजपाचा १, एमआयएमचा १ तर ५ अपक्ष नगरसेवक विजयी झाले आहेत. या निकालामुळे लोणार नगरपालिकेत काँग्रेसचे वर्चस्व स्पष्ट झाले असून आगामी काळात स्थानिक राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे.
📌 हे पण वाचा..
👉 तुमचं मत नोंदवा
मेहकर-लोणार नगरपालिकेच्या निकालाबाबत तुमचं मत काय? उबाठा आणि काँग्रेसचा हा विजय आगामी विधानसभा निवडणुकीवर परिणाम करेल का? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की कळवा.
















