हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मेडिकल अॅडमिशनच्या नावाखाली १३ लाखांची फसवणूक! आयुर्वेदिक संस्थेच्या डॉक्टरवर गुन्हा दाखल

Follow Us:
मेडिकल अॅडमिशनच्या नावाखाली १३ लाखांची फसवणूक प्रकरण
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

डोणगाव |१७ जानेवारी २०२६

मेडिकल अॅडमिशन फसवणूक, डॉक्टर फसवणूक प्रकरण आणि वैद्यकीय शिक्षण घोटाळा असा धक्कादायक प्रकार डोणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आला आहे. मुलीला वैद्यकीय शिक्षणासाठी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखवून आयुर्वेदिक संस्थेच्या एका डॉक्टरने तब्बल १३ लाख ११ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम घाटबोरी येथील प्रकाश पुंजाजी पाखरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी डॉक्टरने २० मार्च २०२३ ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत मेडिकल अॅडमिशन करून देण्याच्या नावाखाली वेळोवेळी मोठी रक्कम घेतली.

आरोपी डॉक्टर प्रशांत रानडे (वय ६७) हे रुरल इन्स्टिट्यूट आयुर्वेदिक रिसर्च सेंटर, मायणी (ता. खटाव, जि. सातारा) येथे संचालक पदावर कार्यरत असून सध्या बोरीवली पूर्व, मुंबई येथे वास्तव्यास असल्याची माहिती आहे.

मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो, असा विश्वास संपादन करून आरोपीने फिर्यादीकडून १३ लाख ११ हजार रुपये स्वीकारले. मात्र, ना प्रवेश मिळाला, ना पैसे परत करण्यात आले. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

या तक्रारीच्या आधारे डोणगाव पोलिसांनी आरोपी डॉक्टर प्रशांत रानडे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६ (२) व ३१८ (१) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

👉 Kattanews.in वर विश्वास ठेवा

अशा शिक्षण फसवणूक, गुन्हेगारी आणि जनहिताच्या बातम्यांसाठी Kattanews.in नियमित वाचा आणि अपडेट राहा.

🔗 हे पण वाचा..

 

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Mehkar Hotel Ekant police raid sex racket two women rescued

मेहकर बायपासवरील ‘हॉटेल एकांत’मध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात दोन महिलांची सुटका

मोहाडी शिवारात बिबट्याचा हल्ला, नीलगाई जखमी

मोहाडी शिवारात बिबट्याचा थरार! नीलगाईवर हल्ला; मादी बिबट्या व दोन पिल्लांचा वावर

Leave a Comment