हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मांगवाडीत NSS चा स्तुत्य उपक्रम; शेकडो ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार

On: January 24, 2026 4:57 PM
Follow Us:
मांगवाडी येथे NSS तर्फे आयोजित मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

रिसोड | २४ जानेवारी २०२६

रिसोड तालुक्यातील मांगवाडी येथे उत्तमचंद बगडिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पथकाच्या वतीने विशेष श्रमसंस्कार शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले. या उपक्रमाला गावकऱ्यांसह शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थिनी व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

हे आरोग्य शिबिर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी डॉ. रामानंद गट्टानी व डॉ. अभिषेक तिवारी हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. शिबिरामध्ये विविध आजारांची तपासणी करून आवश्यक औषधोपचार मोफत देण्यात आले.

या आरोग्य शिबिराचा लाभ मांगवाडी गावातील बहुसंख्य रुग्ण, शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिबिरार्थी स्वयंसेवक तसेच महाविद्यालयातील कर्मचारी यांनी घेतला. उपस्थित मान्यवरांचे NSS पथकाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. एम. पी. खेडेकर या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. ए. जी. वानखेडे यांनी केले. डॉ. रामानंद गट्टानी यांनी आपल्या मनोगतात NSS चा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगत भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

हे पण वाचा.

शेतकऱ्यांचा आक्रोश! पांदण रस्त्यावरील पुलासाठी आमदार श्याम खोडे यांना आडोळी शेतकऱ्यांचे निवेदन

अध्यक्षीय भाषणात डॉ. एम. पी. खेडेकर यांनी ग्रामस्थांनी शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करून सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अंजली पुंड हिने केले तर आभार प्रदर्शन प्रीतम वैरागड याने मानले.

सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. किरण बुधवंत, प्रा. डॉ. मेश्राम, डॉ. कोमल काळे, प्रा. सुमित लाहोरे तसेच सुनील चऱ्हाटे यांनी विशेष परिश्रम घेतले. राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

हे पण वाचा..

अकोला फाटा येथे भीषण दुचाकी अपघात; खाकी वर्दीतील देवदूतामुळे तरुणाचे प्राण वाचले

विजय जुंजारे

विजय जुंजारे हे रिसोड प्रतिनिधी असून वाशिम जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक घडामोडींचे कव्हरेज करतात.त्यांना २ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यक्रमांवर लक्ष ठेवतात. त्यांच्या बातम्या वाचकांना विश्वासार्ह आणि नेमकी माहिती देतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Maharashtra government decision to sell kerosene at petrol pumps due to LPG gas shortage

गॅस टंचाईमुळे मोठा निर्णय! आता पेट्रोल पंपांवर ‘केरोसीन’ मिळणार; विधानसभेत छगन भुजबळांची घोषणा

Leave a Comment