हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

शेतकऱ्यांचा आक्रोश! पांदण रस्त्यावरील पुलासाठी आमदार श्याम खोडे यांना आडोळी शेतकऱ्यांचे निवेदन

On: January 23, 2026 8:30 AM
Follow Us:
आडोळी ते अटकळी पांदण रस्त्यावरील नाल्यावर पूल नसल्याने अडचणीत सापडलेले शेतकरी

वाशीम |२२ जानेवारी २०२६

पांदण रस्ता पूल हा प्रश्न वाशिम तालुक्यातील आडोळी गावातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत ज्वलंत बनला आहे.
आडोळी ते अटकळी या पांदण रस्त्यावर पूल नसल्यामुळे शेतकरी, मजूर आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणी सहन कराव्या लागत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आडोळी शेतकऱ्यांनी आमदार श्याम खोडे यांना निवेदन देत तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.आडोळी येथील शेतकरी नेते राम ईढोळे, गजानन ईढोळे आणि राजू ईढोळे यांनी
वाशिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्याम खोडे यांची भेट घेऊन
स्थानिक विकास निधीतून या पांदण रस्त्यावरील नाल्यावर पूल उभारण्याची गरज मांडली. 

या रस्त्यामधील नाल्यावर वर्षभर पाणी वाहत असल्याने पेरणी, मशागत, पीक काढणी
आणि शेतमाल बाजारात नेण्यासाठी मोठा अडथळा निर्माण होत आहे.
पावसाळ्यात तर हा रस्ता पूर्णपणे बंद पडतो, त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

हे पण वाचा..

रातोरात शेतकऱ्यांचा कणा मोडला! येवती-रिठद शेतशिवारात ३०० पेक्षा जास्त स्प्रिंकलर तोट्यांची मोठी चोरी

जर आडोळी ते अटकळी पांदण रस्त्यावर पूल उभारण्यात आला,
तर शेती कामे सुलभ होतील, वाहतूक सुरक्षित बनेल
आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

त्यामुळे आमदार श्याम खोडे यांनी आपल्या स्थानिक निधीतून तातडीने पूल मंजूर करावा,
अशी ठाम मागणी आडोळी येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


📢 तुमच्या भागातील समस्या आमच्यापर्यंत पोहोचवा

ग्रामीण भागातील समस्या, अन्याय किंवा विकासाच्या मागण्या असतील
तर त्या Kattanews.in कडे पाठवा.
आपली बातमी – आपला आवाज!


🔗 Related News

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

पाडळी शिंदे येथे करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणानंतर घटनास्थळी जमलेले ग्रामस्थ

करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून ५५ वर्षीय व्यक्तीचा खून; अंढेरा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन आरोपींना केली अटक

मर्दडी देवी मंदिर चोरी प्रकरणात CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास

देवीसमोर हात जोडले, नंतर त्याच गाभाऱ्यात चोरी केली! मर्दडीच्या जागृत देवस्थानातील धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद

कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात चिखलीतील यश टिपरे याला नंदुरबार पोलिसांनी अटक

राज्यभर गाजलेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाला चिखली कनेक्शन; माजी स्वीय सहायक यश टिपरे अटकेत

बुलढाण्यात बनावट गर्भवतीच्या सापळ्यात गर्भलिंग निदान प्रकरणात आरोग्य विभागाची कारवाई

बनावट गर्भवतीचा सापळा; ‘पोटात मुलगाच आहे’ म्हणत गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश, गवई पुन्हा जाळ्यात

मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा येथे पोलिसांची कारवाई

मेहकर तालुक्यात मोठी कारवाई; देऊळगाव साकर्शा येथे १ क्विंटल २६ किलो गोमांस जप्त, दोघांना अटक

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे दोन आस्थापनांवर कारवाई करत तीन बाल व किशोरवयीन कामगारांची मुक्तता करण्यात आली.

शेगावात बालकामगारांविरोधात मोठी कारवाई; दोन आस्थापनांतून 3 बाल व किशोरवयीन कामगारांची मुक्तता

Leave a Comment