हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

नाकाबंदीचा मोठा दणका! मलकापूरमध्ये पोलिसांनी पकडली तब्बल ₹47 लाखांची रोकड; दोन वाहनचालक ताब्यात

On: January 20, 2026 2:10 PM
Follow Us:
मलकापूर शहरात पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान जप्त केलेली 47 लाख रुपयांची रोकड
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

मलकापूर |२० जानेवारी २०२६

मलकापूर शहरात पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी दरम्यान मोठी कारवाई समोर आली असून, ₹47 लाखांची रोख रक्कम दोन चारचाकी वाहनांतून जप्त करण्यात आली आहे. मलकापूर पोलीस, नाकाबंदी कारवाई, रोख रक्कम जप्त हे मुद्दे केंद्रस्थानी राहिले असून, ही घटना १८ जानेवारी रोजी मध्यरात्री तहसील चौक परिसरात घडली. या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मलकापूर शहर पोलिस निरीक्षक गणेश गिरी, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत झेंडगे व आरसीपी पथक नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत होते. याच दरम्यान रात्री सुमारे १ वाजता तहसील चौक येथे मुक्ताईनगरकडून येणाऱ्या हुंडाई वेणुकार (MH 21 BV 3378) या वाहनाची तपासणी केली असता, पैशांनी भरलेली बॅग आढळून आली.या बॅगमध्ये ५०० रुपयांच्या २४०० नोटा, २०० रुपयांच्या २००० नोटा व १०० रुपयांच्या ४००० नोटा असा एकूण ₹20 लाखांचा साठा आढळून आला. याच ठिकाणी दुसऱ्या कारवाईत किया सोनेट (MH 21 BQ 8474) या वाहनाच्या डिक्कीतून आणखी ₹26 लाख 78 हजार 850 रुपये रोख रक्कम सापडली.

या दोन्ही घटनांमध्ये एकूण ₹46 लाख 78 हजार 850 रुपये इतकी रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली. या प्रकरणात वाहन चालक जगदीश तारचंद गिरणीवाले (रा. देऊळगाव राजा) व सलीमखान नईमखान (रा. धाड) यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरची रक्कम मलकापूर शहर पोलिसांनी जप्त करून जिल्हा कोषागार कार्यालय, बुलढाणा येथे जमा केली असून, पुढील तपासासाठी आयकर विभाग अकोला, अमरावती व जीएसटी विभाग खामगाव यांना माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांनी दिली.

ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.


🔔 KattaNews.in वर ताज्या बातम्या वाचा

अशाच गुन्हेगारी, पोलीस कारवाई, प्रशासन आणि ग्रामीण भागातील ब्रेकिंग न्यूज सर्वात आधी वाचण्यासाठी KattaNews.in ला भेट द्या व आमच्या अपडेट्स फॉलो करा.


📰 हे‌ पण वाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Mehkar Hotel Ekant police raid sex racket two women rescued

मेहकर बायपासवरील ‘हॉटेल एकांत’मध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात दोन महिलांची सुटका

मोहाडी शिवारात बिबट्याचा हल्ला, नीलगाई जखमी

मोहाडी शिवारात बिबट्याचा थरार! नीलगाईवर हल्ला; मादी बिबट्या व दोन पिल्लांचा वावर

Leave a Comment