हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

“खाज असेल तर नागपुरात या!” धीरेंद्र शास्त्रींचं खुलं आव्हान; श्याम मानवांना थेट चॅलेंज

Follow Us:
धीरेंद्र शास्त्री श्याम मानव नागपूर वाद राम कथा रेशीमबाग

नागपूर |कट्टा न्यूज नेटवर्क 

नागपूरात सध्या एक मोठा वाद पेटला असून बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव आमनेसामने आले आहेत. “खाज असेल तर नागपुरात या!” असं थेट आणि आक्रमक आव्हान देत धीरेंद्र शास्त्री यांनी श्याम मानवांना उघड चॅलेंज दिलं आहे. ₹80 लाखांच्या बक्षिसाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद आता चांगलाच चिघळला आहे. नागपूरच्या रेशीमबाग येथे सुरू असलेल्या रामकथेच्या कार्यक्रमात केलेल्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून नागरिकांमध्ये तीव्र चर्चा रंगली आहे.

धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या भाषणात स्पष्ट शब्दांत सांगितले की, ते नागपूरात पाच दिवस उपस्थित राहणार असून कोणालाही शंका असल्यास त्यांनी थेट येऊन प्रश्न विचारावेत. “आम्ही जादूगार नाही, पण ईश्वराच्या प्रेरणेने लोकांना मार्गदर्शन करतो,” असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित लोकांमध्ये उत्सुकता वाढली असून सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनीही या आव्हानाला उत्तर देत धीरेंद्र शास्त्रींवर टीका केली आहे. “जर त्यांनी चमत्कार सिद्ध केला आणि 90 टक्के अचूकता दाखवली, तर आम्ही आमची संस्था बंद करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊ,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांच्या या विधानामुळे वाद अधिकच तीव्र झाला आहे.

दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या या आरोप-प्रत्यारोपामुळे नागपूरातील वातावरण चांगलंच तापलं असून पुढील काही दिवसांत हा वाद आणखी रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः रेशीमबाग येथील रामकथेच्या पार्श्वभूमीवर या वादाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


👉 Related News


📢 हे आवश्यक करा..

अशा ताज्या आणि व्हायरल बातम्यांसाठी आमच्या Kattanews.in ला भेट द्या. ही बातमी शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा.

 

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

Leave a Comment