हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

Malkapur crime : शिवणी-तळसवाडा रस्त्यावर ऑटोचालकाची निर्घृण हत्या! गळा आवळून खून केल्याचा पोलिसांचा संशय

On: January 9, 2026 7:03 AM
Follow Us:
Malkapur crime मलकापूर गुन्हेगारी बातमी – शिवणी तळसवाडा रस्त्यावर ऑटोचालकाची निर्घृण हत्या

मलकापूर /प्रवीण गरुडे 

Malkapur crime auto driver murder प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिवणी-तळसवाडा रस्त्यावर एका तरुण ऑटोचालकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. ८ जानेवारी २०२६) सकाळी उघडकीस आली. अमोल भाऊराव भवरे (वय ३५, रा. धरणगाव, ता. मलकापूर, जि. बुलढाणा) असे मृत तरुणाचे नाव असून, गळा आवळून त्याचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अमोल भवरे हा व्यवसायाने ऑटोचालक असून शेतीही करत होता. बुधवारी (दि. ७ जानेवारी) सायंकाळी सुमारे ७ ते ७.३० वाजेदरम्यान तो स्वतःचा ऑटो घेऊन शिवणी व भोळी शिवारातील शेत पाहण्यासाठी घराबाहेर पडला होता. मात्र त्यानंतर तो घरी परतला नाही.

गुरुवारी सकाळी सुमारे ७ वाजता तळसवाडा-शिवणी रस्त्यालगत राजू रजनिकांत नारखेडे यांच्या शेताच्या कडेला एका व्यक्तीचा मृतदेह पडल्याचे आढळून आले. अजय अनिल गायकवाड (रा. निंबोळी) यांनी ही बाब गावकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केली असता मृतदेह अमोल भवरे यांचाच असल्याचे निष्पन्न झाले.

घटनेची माहिती मिळताच मलकापूर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालय, मलकापूर येथे पाठविण्यात आला. प्राथमिक तपासात मृतकाच्या गळ्यावर गळा आवळल्याच्या खुणा आढळून आल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय अधिक बळावला आहे.

या प्रकरणी मृतकाचे नातेवाईक विजय प्रभाकर भवरे (वय ४९, रा. शिवणी) यांनी तोंडी फिर्याद दिली असून, मृत्यूबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मलकापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय टेकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

हे पण वाचा..

सहकार क्षेत्रात मोठी खळबळ! बुलडाण्यातील १३ पतसंस्थांचे परवाने रद्द होण्याच्या मार्गावर; सभासदांच्या ठेवींवर काय परिणाम होणार?

दरम्यान, खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मृतकाचे शेवटचे संपर्क, तसेच वैयक्तिक किंवा व्यावसायिक वादाच्या शक्यतेच्या दृष्टीने पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या घटनेमुळे शिवणी-तळसवाडा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


👉 अशाच ताज्या, सत्य आणि विश्वासार्ह  बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या.

🔗 Related News :

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

वडगाव तेजन रॉबरी: सरस्वती विद्यालय परिसरात महिलेची सोन्याची पोत ओरबाडली

शाळेच्या परिसरातच महिलेच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याची पोत ओरबाडली; वडगाव तेजनमध्ये दिवसाढवळ्या रॉबरी

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

वाकोडी (मलकापूर) येथे भरदुपारी पोत हिसकावण्याचा प्रयत्न झालेले काजळे यांचे घर

भरदुपारी चाकूचा धाक दाखवून महिलेची पोत हिसकावण्याचा प्रयत्न; आरडाओरड होताच तरुण धावले अन् चोरट्याने पळ काढला!

बुलढाणा वन सर्वेक्षक लाच प्रकरणात एसीबीची कारवाई

लाकूड वाहतुकीच्या परवानगीसाठी २ हजारांची लाच; बुलढाण्यात वन सर्वेक्षकावर गुन्हा दाखल

बेपत्ता महिला शेगाव - पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

शेगाव: ब्युटी पार्लरमध्ये जाते सांगून घराबाहेर पडलेली महिला बेपत्ता, पतीची पोलिसांत तक्रार

Leave a Comment