हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

महावितरणचा धक्कादायक प्रकार! नागरिकांची परवानगी न घेता घरोघरी जबरदस्ती स्मार्ट मीटर – आदेश कुणाचा?

On: January 7, 2026 2:19 PM
Follow Us:
महावितरणकडून घराघरात स्मार्ट मीटर बसवताना कर्मचारी, नागरिकांचा विरोध
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

विजय जुंजारे/रिसोड :

अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यांमध्ये महावितरण स्मार्ट मीटर बसवणीवरून गंभीर वाद निर्माण झाला आहे. नागरिकांची कोणतीही लेखी अथवा तोंडी संमती न घेता महावितरण स्मार्ट मीटर (smart meter) थेट घराघरांत बसवले जात असल्याचे आरोप होत आहेत. महावितरण स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक ग्राहकांची वीज बिले अचानक वाढल्याची उदाहरणे समोर येत असून, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. सध्या महावितरण स्मार्ट मीटर ही बाब जनतेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.

महावितरणचे कर्मचारी “वरून आदेश आहेत” असे सांगत मीटर बदलत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, या आदेशांची कोणतीही लेखी माहिती किंवा अधिकृत सूचना नागरिकांना दिली जात नाही. विशेष म्हणजे, स्मार्ट मीटर बसवण्याचे काम Genus Power Infrastructure Ltd. या कंपनीमार्फत सुरू आहे.

स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक ठिकाणी वीज बिल दुप्पट झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. याचा थेट फटका गरीब, शेतकरी, मजूर आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना बसत आहे. आधीच महागाईने हैराण झालेल्या जनतेसाठी वाढलेली वीज बिले मोठे आर्थिक संकट ठरत आहेत.

याचबरोबर स्मार्ट मीटरमुळे घरगुती दळणाचे दर प्रति किलो पाच रुपये झाले असून, हा अप्रत्यक्ष खर्च सामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार टाकणारा ठरत आहे. अकोला, वाशिम व बुलढाणा हे जिल्हे आर्थिकदृष्ट्या मागासलेले असल्याने येथे अशा योजना लादण्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

ग्राहक व सामाजिक संघटनांनी या प्रकरणी सरकारकडे थेट सवाल उपस्थित केले आहेत. ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बसवण्याचा अधिकार कुणी दिला, वाढलेल्या बिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष का केले जात आहे, आणि मागास जिल्ह्यांनाच लक्ष्य का केले जात आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

या संपूर्ण प्रकरणाकडे राज्य सरकारने तातडीने लक्ष देऊन स्मार्ट मीटर बसवणी थांबवावी व नागरिकांच्या तक्रारींची सखोल चौकशी करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा येत्या काळात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

📢 तुमच्या भागातही स्मार्ट मीटरमुळे बिल वाढले आहे का?
असा अनुभव असल्यास Kattanews.in शी संपर्क साधा. तुमचा आवाज आम्ही सरकारपर्यंत पोहोचवू.

🔗 संबंधित बातम्या :

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Maharashtra government decision to sell kerosene at petrol pumps due to LPG gas shortage

गॅस टंचाईमुळे मोठा निर्णय! आता पेट्रोल पंपांवर ‘केरोसीन’ मिळणार; विधानसभेत छगन भुजबळांची घोषणा

Leave a Comment