हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

लोणार-मेहकर रोडवर भीषण अपघात! काळी-पिवळी विद्युत खांबाला धडकुन उलटली; अनेक प्रवासी जखमी, रुग्णालयात उपचार सुरू.

On: November 28, 2025 8:34 AM
Follow Us:
लोणार-मेहकर रोडवर काळी-पिवळी वाहनाचा अपघात.
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

विनायक कुंटे/लोणार प्रतिनिधी

लोणार-मेहकर रोड अपघात आज सकाळी एक मोठी घटना ठरली. या लोणार-मेहकर रोड अपघातात काळी-पिवळी वाहनाने अचानक तोल गमावला आणि विद्युत खांबाला धडक देत उलटले. धडक झाल्यानंतर लोणार-मेहकर रोड अपघात अधिक गंभीर बनला आणि अनेक प्रवासी जखमी झाले.
या लोणार-मेहकर रोड अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी एकच गोंधळ उडाला व स्थानिकांनी पोलिसांना सतर्क केले.लोणारमध्ये मेहकरहून येणारी एमएच-३७ बी-३५३९ क्रमांकाची काळी-पिवळी प्रवासी वाहन गजानन महाराज मंदिराजवळील वळणावर आले असता वाहनाचे नियंत्रण सुटले आणि ती थेट विद्युत खांबाला धडकून उलटली. अपघातात गणेश त्र्यंबक साठे, वैभव विजय मानवतकर, सतीश परमेश्वर पवार, वैष्णवी गजानन मोहिते, मोहित गजानन आनंदराव, कार्तिक किसन तेजनकर यांसह इतर काही प्रवासी जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिस गीते आणि दराडे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली आणि तातडीने त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयीन सूत्रांनी सांगितले की सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास लोणार पोलिसांकडून सुरू आहे.

👉 ताज्या अपडेटसाठी KattaNews.in फॉलो करा

आपल्या गावातील आणि परिसरातील ब्रेकिंग बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आजच नोटिफिकेशन ऑन करा. व व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. Click here.. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

🔗 संबंधित बातम्या

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Mehkar Hotel Ekant police raid sex racket two women rescued

मेहकर बायपासवरील ‘हॉटेल एकांत’मध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात दोन महिलांची सुटका

Leave a Comment