हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

रेतीसाठी जीव गहाण! लोणार–मंठा महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा

On: December 21, 2025 8:49 AM
Follow Us:
लोणार–मंठा महामार्गावरील अवैध रेती वाहतूक

लोणार/विनायक कुटे :

सध्या रेतीसाठी जीव गहाण अशी परिस्थिती लोणार–मंठा महामार्गावर पाहायला मिळत आहे. विकासाचा मार्ग म्हणून ओळखला जाणारा लोणार–मंठा महामार्ग आज अपघात, भीती आणि मृत्यूचे प्रतीक बनत चालला आहे. अवैध रेती वाहतुकीमुळे लोणार–मंठा महामार्गावरून प्रवास करणे धोक्याचे ठरत असून अनेकांना हा लोणार–मंठा महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा वाटू लागला आहे.

या मार्गावर अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर सर्रास धावत असून अनेक टिप्परांना नंबर प्लेटच नसल्याचे चित्र आहे. त्यातच काही चालक नशेत असल्यामुळे हे अवजड टिप्पर बेधडकपणे चालवले जात आहेत. परिणामी दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक, प्रवासी आणि पादचारी यांचा जीव अक्षरशः धोक्यात आला आहे.नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळी टिप्पर मालकांचे एजंट फोर-व्हीलर गाड्यांमधून रस्त्यावर गस्त घालत फिरत असल्याचे दिसते. या टोळ्यांना काही आका-बोक्यांचा पाठिंबा असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून त्यामुळेच कारवाई होत नाही का, असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.कायदे कागदांपुरते मर्यादित राहिले आहेत, जबाबदाऱ्या फाईलमध्ये अडकल्या आहेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर सामान्य माणसाचा जीव रेतीपेक्षाही स्वस्त ठरत असल्याचे भयावह वास्तव समोर येत आहे. आजची डोळेझाक उद्याच्या मोठ्या शोकांतिकेचे कारण ठरू शकते, अशी भीती नागरिकांच्या मनात घर करून बसली आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

या संदर्भात राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष तानाजी मापारी यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, आजचा निष्काळजीपणा उद्याचा शोक ठरू नये. रेती पुन्हा मिळू शकते, पण गेलेला जीव कधीच परत येत नाही.

हे पण वाचा..

‘ऑन ड्यूटी’ पोलिसावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला! कर्तव्यावर जातानाच बेदम मारहाण; बुलढाणा बसस्थानक हादरले.

👉 लोणार–मंठा महामार्गावरील अवैध रेती वाहतुकीवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

अशा महत्त्वाच्या आणि धक्कादायक स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला रोज भेट द्या आणि ही बातमी शेअर करून जनजागृती करा.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

पाडळी शिंदे येथे करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणानंतर घटनास्थळी जमलेले ग्रामस्थ

करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून ५५ वर्षीय व्यक्तीचा खून; अंढेरा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन आरोपींना केली अटक

मर्दडी देवी मंदिर चोरी प्रकरणात CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास

देवीसमोर हात जोडले, नंतर त्याच गाभाऱ्यात चोरी केली! मर्दडीच्या जागृत देवस्थानातील धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद

कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात चिखलीतील यश टिपरे याला नंदुरबार पोलिसांनी अटक

राज्यभर गाजलेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाला चिखली कनेक्शन; माजी स्वीय सहायक यश टिपरे अटकेत

बुलढाण्यात बनावट गर्भवतीच्या सापळ्यात गर्भलिंग निदान प्रकरणात आरोग्य विभागाची कारवाई

बनावट गर्भवतीचा सापळा; ‘पोटात मुलगाच आहे’ म्हणत गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश, गवई पुन्हा जाळ्यात

मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा येथे पोलिसांची कारवाई

मेहकर तालुक्यात मोठी कारवाई; देऊळगाव साकर्शा येथे १ क्विंटल २६ किलो गोमांस जप्त, दोघांना अटक

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे दोन आस्थापनांवर कारवाई करत तीन बाल व किशोरवयीन कामगारांची मुक्तता करण्यात आली.

शेगावात बालकामगारांविरोधात मोठी कारवाई; दोन आस्थापनांतून 3 बाल व किशोरवयीन कामगारांची मुक्तता

Leave a Comment