हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

लोणारमध्ये महिला लोककलावंतांचा गौरव; शाहीर कृष्णकांत जोशी संस्थेकडून शाल, प्रशस्तीपत्र आणि वडाच्या रोपांचे वाटप

Follow Us:
लोणार येथे शाहीर कृष्णकांत जोशी बहुउद्देशीय संस्थेतर्फे संत जनाबाई महिला मंडळातील महिला लोककलावंतांचा शाल, प्रशस्तीपत्र आणि वडाच्या रोपांचे वाटप करून सन्मान करण्यात आला.

प्रा. दिलीप नाईकवाड | बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथील शाहीर कृष्णकांत जोशी बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने लोणार येथील संत जनाबाई महिला मंडळातील लोककलावंत महिलांचा शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रत्येक महिलेला वृक्षारोपणासाठी वडाच्या झाडाचे रोपही भेट देण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. अनुराधा रमेश बनमेरु या होत्या. संत जनाबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा देवकाबाई मापारी, सचिव सविता धनेकर तसेच कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक व संस्थेचे अध्यक्ष शाहीर कृष्णकांत जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

कार्यक्रमात बनमेरू महाविद्यालयाचे कोषाध्यक्ष रमेश बनमेरु तसेच संस्थेचे जगदीश इरतकर यांच्या हस्ते इंदुबाई मापारी, अनिता मापारी, नदांबाई नाईकवाडे, भारता मापारी, रत्नमाला मोरे, चंद्रभागाबाई मापारी, शिलाबाई सुरुजोशे, कांताबाई मापारी, अन्नपूर्णा आखाडे, विजया सेवक, आशा मापारी, दुर्गा धनेकर, शिलाबाई मापारी, चंद्रभागाबाई धनेकर, सुमन मापारी, शालुबाई काळे, गोदावरी मापारी, मिनाबाई खरबड, नंदाबाई मापारी, संगीता मापारी आणि परागबाई गोरे यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सौ. संजीवनी इरतकर यांनी केले. उपस्थितांनी लोककलेच्या जतनासाठी महिला कलाकारांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी संस्थेच्या वतीने संत जनाबाई महिला मंडळातील प्रत्येक महिलेला वृक्षारोपणासाठी वडाच्या झाडाचे रोप देण्याचा संकल्प करण्यात आला. पर्यावरण संवर्धनासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा आणि प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष शाहीर कृष्णकांत जोशी यांनी केले.

लोककलेचा वारसा जपत महिला कलाकारांचा गौरव आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला.


👉 अशाच बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.


Related News:

 

प्रा. दिलीप नाईकवाड

प्रा. दिलीप नाईकवाड हे Katta News साठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून बातम्या देतात. ते राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैचारिक विषयांवर वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक लेखन करतात. ते मागील 15+ वर्षांपासून शिक्षण व वैचारिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

नांदुरा येथील पूर्णा नदीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पूर्णा नदीत पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू; नांदुर्यात शोककळा

साखरखेर्डा गट क्रमांक 870 जमीन प्रकरणात क्रीडांगणाची पाहणी करताना माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

साखरखेर्डा गट नं. 870 जमीन प्रकरण गाजले; बनावट फेरफार, भूमाफियांचा डाव? महसूल कलम 155 अंतर्गत कारवाईची मागणी

देऊळगाव राजा येथे पंढरपूरकडे जाणाऱ्या पायी दिंडीतील 51 महिला वारकऱ्यांना वस्त्रदान व अन्नदान करताना

देऊळगाव राजात सेवाभावाचा आदर्श! पायी दिंडीतील 51 महिला वारकऱ्यांना वस्त्रदान, अन्नदानाने जिंकली मने

साखरखेर्डा येथील बंद असलेला पशुवैद्यकीय दवाखाना

साखरखेर्ड्यात ना डॉक्टर, ना कर्मचारी; पशुवैद्यकीय दवाखाना कायम बंद, २५ गावांतील पशुपालक अडचणीत

साखरखेर्डा येथील सरकारी ई-क्लास क्रीडांगणाच्या जमिनीवर जमलेले युवक

साखरखेर्ड्यात सरकारी ई-क्लास जमिनीवर डल्ला? क्रीडांगण नांगरून ताबा घेण्याचा प्रयत्न; युवक संतप्त

शिंदी गावात 24 तासांत तिघांचा मृत्यू; दोघांचा हृदयविकाराने तर एकाचा ब्रेन हॅमरेजने मृत्यू

शिंदीत 24 तासांत तिघांचा मृत्यू; दोघांचा हृदयविकाराने तर एकाचा ब्रेन हॅमरेजने, गावावर शोककळा

Leave a Comment