हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

खामगाव–नांदुरा महामार्गावर काळजाचा थरार! अज्ञात वाहनाच्या धडकेत माय-लेकीचा जागीच मृत्यू

On: December 19, 2025 8:33 AM
Follow Us:
खामगाव-नांदुरा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी अपघातात माय लेकीचा मृत्यू
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

खामगाव/प्रतिभा जगदने 

खामगाव–नांदुरा महामार्ग अपघात प्रकरणात पुन्हा एकदा निष्पाप जीवांचा बळी गेला आहे.आमसरी फाट्यानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत माय-लेकीचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना १८ डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली.

या दुचाकी अपघात प्रकरणात पती गंभीर जखमी झाला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

नांदुरा तालुक्यातील नारायणपूर (निमगाव) येथील रहिवासी दिलीप प्रभाकर बोंबटकार (वय ३५), त्यांची पत्नी सौ. शितल दिलीप बोंबटकार (वय ३०) आणि त्यांची तीन वर्षांची मुलगी कु. श्रावणी हे दुचाकी क्रमांक एमएच २८ एच १५६५ ने नांदुराहून खामगावकडे जात होते.

खामगाव–नांदुरा राष्ट्रीय महामार्गावरील आमसरी फाट्यानजीक अचानक एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत सौ. शितल बोंबटकार आणि चिमुकली श्रावणी यांचा जागीच मृत्यू झाला, तर दिलीप बोंबटकार हे गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच जलंब पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

तसेच ओम साई फाउंडेशनचे विलास निंबोळकर, अश्विन फेरण, गणेश वनारे आदींनी तत्काळ मदतकार्य करत जखमीला रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल केले.

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढत असल्याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


📢 नागरिकांसाठी आवाहन

आपल्या परिसरातील बातम्या, अपघात, सामाजिक प्रश्न आम्हाला पाठवा.
Kattanews.in – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ.


🔗 Related News

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Maharashtra government decision to sell kerosene at petrol pumps due to LPG gas shortage

गॅस टंचाईमुळे मोठा निर्णय! आता पेट्रोल पंपांवर ‘केरोसीन’ मिळणार; विधानसभेत छगन भुजबळांची घोषणा

Leave a Comment