हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

जिजाऊ सृष्टीवर नगराध्यक्ष सौरभ तायडे यांचा गौरव; जिजाऊ जन्मोत्सव 2026 च्या नियोजनाला नवे बळ

On: December 28, 2025 12:08 PM
Follow Us:
जिजाऊ सृष्टीवर जिजाऊ जन्मोत्सव 2026 नियोजनासाठी नगराध्यक्ष सौरभ तायडे यांचा सत्कार

सिंदखेडराजा | प्रा. दिलीप नाईकवाड, बुलढाणा

सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक जिजाऊ सृष्टी परिसरात नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौरभ तायडे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
जिजाऊ जन्मोत्सव 2026 च्या नियोजनासाठी आलेल्या केंद्रीय आयोजन समितीच्या वतीने हा सत्कार सोहळा पार पडला.
जिजाऊ सृष्टी हे केवळ एक पर्यटन स्थळ नसून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

यावेळी मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घोगरे,
जिजाऊ सृष्टीचे अध्यक्ष मधुकर मेहेकरे
आणि प्रदेश कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे
यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांची प्रतिमा, मराठा सेवा संघाचे कॅलेंडर व पुस्तक भेट देत नगराध्यक्षांचा गौरव केला.

कार्यक्रमाला प्रा. शिवाजी तनपुरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे,
जिजाऊ सृष्टीचे सहसचिव सौरभ खेडेकर, प्रकल्प संचालक अरविंद गावंडे,
मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चेके, मुख्य समन्वयक डॉ. मनोहर तुपकर,
जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष उर्मिलाताई हाडे, वारकरी परिषदेच्या ज्योतीताई जाधव,
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील, तालुकाध्यक्ष विजय देशमुख
यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सौरभ तायडे हे महाराष्ट्रातील सर्वात तरुण नगराध्यक्ष असून,
राष्ट्रमाता जिजाऊंच्या पावन भूमीत नागरिकांच्या सेवेसाठी त्यांना मिळालेली संधी ही ऐतिहासिक आहे.
निवडणुकीनंतर लगेचच १२ जानेवारी २०२६ रोजी जिजाऊ जन्मोत्सव साजरा होत असल्याने,
हा योगायोग शहराच्या विकासासाठी निर्णायक ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्ष सौरभ तायडे म्हणाले की,
जिजाऊ जन्मोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्राचा सांस्कृतिक व ऐतिहासिक उत्सव आहे.
जिजाऊ नगरीचे वैभव जपणे आणि मातृतीर्थ सिंदखेडराजाचा सर्वांगीण विकास साधणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट राहील.
मराठा सेवा संघाच्या आयोजन समितीबरोबर समन्वय ठेवून नगराध्यक्ष म्हणून कोणतीही कमतरता भासू देणार नाही,
असे आश्वासन त्यांनी दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास तेजनकर यांनी केले.
या वेळी मोठ्या संख्येने जिजाऊ सृष्टीवरील पदाधिकारी व जिजाऊ भक्त उपस्थित होते.


हे आवश्य करा..

👉 Kattanews महाराष्ट्रातील नंबर एकची न्यूज वेबसाईट
राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, ब्रेकिंग न्यूजसाठी
Kattanews.in ला आत्ताच फॉलो करा.


हे पण वाचा..

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

वडगाव तेजन रॉबरी: सरस्वती विद्यालय परिसरात महिलेची सोन्याची पोत ओरबाडली

शाळेच्या परिसरातच महिलेच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याची पोत ओरबाडली; वडगाव तेजनमध्ये दिवसाढवळ्या रॉबरी

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

Leave a Comment