मेहकर/प्रतिनिधी
मेहकर –लोणार विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिद्धार्थ खरात यांनी नागरिकांच्या अडचणी आणि तक्रारींना थेट न्याय मिळवून देण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे.‘जनता दरबार’ या उपक्रमाद्वारे प्रशासन थेट जनतेच्या दारात पोहोचणार आहे. हा जनता दरबार गुरुवार, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता, कृषी वैभव प्राईड (के. व्ही. प्राईड हॉल), मेहकर येथे पार पडणार आहे.
प्रशासन आणि जनता एकाच मंचावर
या दरम्यान तालुका स्तरावरील सर्व शासकीय अधिकारी उपस्थित राहणार असून नागरिकांना आपल्या समस्या, तक्रारी आणि मागण्या थेट अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळणार आहे.आमदार सिद्धार्थ खरात यांनी सांगितले की, “जनतेच्या दारात प्रशासन पोहोचविणे आणि लोकांच्या अडचणी प्रत्यक्ष ऐकून त्यावर निर्णय घेणे हा माझा उद्देश आहे.”
📝 तक्रारी सादर करण्याची प्रक्रिया
नागरिकांनी आपली तक्रार किंवा मागणी लेखी स्वरूपात दोन प्रतींमध्ये सोमवार, २९ ऑक्टोबरपूर्वी आमदार सिद्धार्थ खरात यांच्या जनसंवाद कार्यालय (डोणगाव रोड, मेहकर) येथे सादर करावी.एक प्रत संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवली जाणार असून दुसऱ्या प्रतीवर जनता दरबारात प्रत्यक्ष चर्चा होणार आहे.
आमदार खरात यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, “मेहकर तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी मोठ्या संख्येने जनता दरबारात सहभागी व्हावे. प्रशासन आणि जनतेमधील थेट संवादातूनच प्रश्न सुटतात आणि विकासाचा मार्ग मोकळा होतो.”











