हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

अवैध रेती वाहतुकीचा कहर! आडविहीर पुलावर रेती सांडली; २ कार थेट नाल्यात कोसळल्या

On: December 27, 2025 4:44 PM
Follow Us:
अवैध रेती वाहतुकीमुळे आडविहीर पुलावर रेती सांडून भीषण अपघात
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

मोताळा | प्रवीण गरुडे कट्टा न्यूज नेटवर्क

मोताळा–नांदुरा–बुलढाणा मार्गावर सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकीचा गंभीर परिणाम गुरुवारी रात्री पाहायला मिळाला.
अवैध रेती वाहतुकीदरम्यान एका टिप्परमधून पुलावर रेती सांडल्याने भीषण अपघात घडला.
आडविहीर पुलावर रस्त्यावर पसरलेल्या रेतीमुळे दोन चारचाकी गाड्या थेट नाल्यात कोसळल्या.
या घटनेमुळे पुन्हा एकदा अवैध रेती वाहतूक नागरिकांच्या जीवासाठी किती धोकादायक ठरत आहे,
हे स्पष्ट झाले आहे.

नांदुरा तालुक्यातील एका रेती घाटातून परवानगी असल्याचे सांगत शेकडो टिप्पर, हायवा व ट्रॅक्टरद्वारे
दिवसरात्र रेती, माती व मुरुमाची वाहतूक सुरू आहे.
या वाहनांमधून रस्त्यावर सतत रेती सांडत असल्याने अनेक ठिकाणी वाहने घसरून अपघात होत आहेत.
हे प्रकार नित्याचे असतानाही महसूल व पोलीस विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

२५ डिसेंबरच्या रात्री ९ ते १० वाजेदरम्यान एका अज्ञात टिप्परमधून आडविहीर येथील पुलावर
१०० ते २०० फूट अंतरापर्यंत रेती सांडली.
नागमोडी वळण व अंधारामुळे रस्त्यावरील रेतीचा अंदाज न आल्याने
MH-04-JD-8245 क्रमांकाची कार पुलाचे कठडे तोडून ७० ते ८० फूट खोल नाल्यात कोसळली,
तर MH-19-CF-0069 ही दुसरी कारही अपघातग्रस्त झाली.

या अपघातात ५ ते ६ जण जखमी झाले असून अनेक दुचाकीस्वार व इतर वाहनेही घसरून पडली.
सुदैवाने दोन्ही कारमधील सर्व प्रवासी सुरक्षित असून
पोलिस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले.
धक्कादायक बाब म्हणजे इतक्या मोठ्या घटनेची कुठेही अधिकृत नोंद झालेली नाही.


📢 खरी बातमी, थेट अपडेट्स! Kattanews.in – महाराष्ट्रातील नंबर एक न्यूज वेबसाईट फॉलो करा.
🔗 हे पण वाचा:

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Mehkar Hotel Ekant police raid sex racket two women rescued

मेहकर बायपासवरील ‘हॉटेल एकांत’मध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात दोन महिलांची सुटका

मोहाडी शिवारात बिबट्याचा हल्ला, नीलगाई जखमी

मोहाडी शिवारात बिबट्याचा थरार! नीलगाईवर हल्ला; मादी बिबट्या व दोन पिल्लांचा वावर

Leave a Comment