मोताळा (बुलढाणा) | २६ जानेवारी २०२६
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रध्वजाला मानवंदना देताना मुख्याध्यापकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहेगाव येथे आयोजित ध्वजारोहणावेळी
मुख्याध्यापक दिलीप राठोड यांना अचानक छातीत तीव्र वेदना झाल्या आणि ते खाली कोसळले.मोहेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत २६ जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पार पडत होता.

राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्याच्या क्षणीच मुख्याध्यापक दिलीप राठोड यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
कर्तव्यावर असताना आणि राष्ट्रध्वजासमोरच प्राण गमावल्याने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दिलीप राठोड हे मनमिळावू, कर्तव्यनिष्ठ आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जात होते.
त्यांच्या अकस्मात निधनाने शिक्षण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
घटनेनंतर शाळेतील कार्यक्रम तातडीने स्थगित करण्यात आला.
गावात शोककळा पसरली असून अनेक नागरिकांनी शाळेत जाऊन श्रद्धांजली वाहिली.
👉 अशा हृदयद्रावक व ताज्या बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या.
हे पण वाचा.
- देऊळगाव राजात चोरट्यांचा हैदोस! एकाच रात्री तीन मंदिरांत धाडसी चोरी; ५६ हजारांचा ऐवज लंपास, आरोपी CCTVत कैद
- पाटोदा येथे एसटी बसचा कहर; बाहेर निघालेल्या लोखंडी पत्र्यामुळे भीषण अपघात, एक जण गंभीर जखमी
- धक्कादायक प्रकार! बुलढाण्यात महिला तलाठीच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न; रेती माफियाची दहशत उघड










