हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

गोरेगाव ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी आमरण उपोषणाची सांगता; गटविकास अधिकाऱ्यांचे ठोस आश्वासन

On: January 22, 2026 6:06 PM
Follow Us:
गोरेगाव ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणातील उपोषणाची सांगता
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

सिंदखेडराजा | २२ जानेवारी २०२६

गोरेगाव ग्रामपंचायतमध्ये झालेल्या प्रचंड भ्रष्टाचार व गैरकारभाराच्या आरोपांवरून सुरू असलेल्या आमरण उपोषणाची अखेर गटविकास अधिकाऱ्यांच्या ठोस आश्वासनानंतर मंगळवारी (ता.२१) रात्री सुमारे ८ वाजता सांगता झाली. ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.

गोरेगाव येथील जागरूक (Gen-Z) युवकांनी ग्रामपंचायतीतील गैरव्यवहार, निधी अपहार व अनियमित कारभाराविरोधात ता.१९ जानेवारीपासून ग्रामपंचायतसमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालल्याने तसेच गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने प्रशासनाने अखेर दखल घेतली.

सिंदखेडराजा पंचायत समितीचे वर्ग-१ संवर्ग विकास अधिकारी अजित कुमार बांगर हे आपल्या पथकासह गोरेगाव येथे दाखल झाले. यावेळी ठाणेदार गजानन करेवाड यांनी उपोषणकर्त्यांची प्रकृती व परिस्थितीचे गांभीर्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

गटविकास अधिकारी अजित कुमार बांगर यांनी ग्रामविकास अधिकाऱ्याची तात्काळ बदली, तसेच ग्रामपंचायतमधील गैरप्रकारांची विविध स्तरांवर चौकशी करण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी निंबू-पाणी पिऊन उपोषण सोडले.

यावेळी जेष्ठ नागरिक व माजी उपसरपंच भिकाजी पाटील, जेष्ठ पत्रकार प्रा. दिलीप नाईकवाड, माजी प्राचार्य व जेष्ठ पत्रकार डी.एन. पांचाळ, पत्रकार भगवानराव देशमुख, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष विजय देशमुख,विस्तार अधिकारी राजेश्वर पवार, ग्रामविकास अधिकारी उध्दव गायकवाड, अशोक बुरकुल, अविनाश नागरे, उपसरपंच अख्तरखान पठाण, तंटामुक्ती अध्यक्ष खुशालराव पांचाळ, माजी सरपंच कडुबा गवई यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

नितीन रमेश पंचाळ, जीवन गजानन पंचाळ, गजानन डिगांबर पंचाळ, अमोल संजय पंचाळ या युवकांनी यापूर्वी ऑक्टोबर महिन्यातही उपोषण केले होते. मात्र त्या वेळी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्याने पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला होता.

हे पण वाचा..

दिवाळी गेली, मदत नाही! राहेरी बु. येथील शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित

ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांनी सुमारे १ लाख ६० हजार रुपयांचा अपहार केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले असून, त्यांच्यावर कारवाईसाठी प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे सादर करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी अजित कुमार बांगर यांनी दिली.

 

संबंधित बातमी:

गोरेगावमध्ये ग्रामपंचायत भ्रष्टाचाराचा आरोप; ५ युवकांचे बेमुदत उपोषण सुरू

हे आवश्यक करा

तुमच्या गावातील समस्या, भ्रष्टाचार किंवा प्रशासनाच्या हलगर्जीपणाची बातमी आम्हाला पाठवा – Kattanews.in

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Mehkar Hotel Ekant police raid sex racket two women rescued

मेहकर बायपासवरील ‘हॉटेल एकांत’मध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात दोन महिलांची सुटका

मोहाडी शिवारात बिबट्याचा हल्ला, नीलगाई जखमी

मोहाडी शिवारात बिबट्याचा थरार! नीलगाईवर हल्ला; मादी बिबट्या व दोन पिल्लांचा वावर

Leave a Comment