हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

आई-वडिलांच्या वाटण्यासाठी त्यांची अवहेलना करू नका – समा महाराज दौंडकरांचे समाजाला अंतर्मुख करणारे प्रबोधन

On: January 23, 2026 7:42 PM
Follow Us:
सवडद येथे गणेश जयंती महोत्सवात समाजप्रबोधन करताना ह भ प समा महाराज दौंडकर

साखरखेर्डा |२३ जानेवारी २०२६

भगवंताने माणसाला ज्ञान, इंद्रिय आणि विवेक दिला आहे, मग गर्व कशाचा? प्रपंच करीत असतानाच परमार्थ केला पाहिजे, तरच जीवन पूर्णत्वास जाते, असे मौलिक विचार तृतीयपंथी किर्तनकार ह.भ.प. समा महाराज दौंडकर यांनी व्यक्त केले. सवडद येथे आयोजित गणेश जयंती महोत्सवात त्यांनी समाजाला अंतर्मुख करणारे प्रबोधन केले.

“आई-वडिलांच्या वाटण्यासाठी त्यांची अवहेलना करू नका. त्यांनी जसे आपल्याला सांभाळले, तसेच त्यांनाही प्रेमाने जपा,” असे स्पष्ट आणि परखड शब्दांत त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

२१ जानेवारी रोजी रात्री समा महाराज दौंडकर यांच्या किर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले होते. त्यापूर्वी डी.जे.च्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. संत तुकाराम महाराजांच्या “लागोनिया पाया विनवितो तुम्हाला” या अभंगावर आधारित किर्तनातून त्यांनी सामाजिक वास्तव मांडले.

ते म्हणाले, “आम्ही तृतीयपंथीय आहोत हे आम्ही नाकारत नाही, पण समाज आम्हाला का नाकारतो हे समजत नाही. प्रपंचाचा अधिकार नसला तरी परमार्थाचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.” टोल नाक्यावर किंवा बाजारात टाळी वाजवून पैसे मागितले तर द्या किंवा नका देऊ, पण माणूस म्हणून अवहेलना करू नका, एवढीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

“तो जेवला का? कसा आहे?” एवढी आपुलकी दाखवा, तृतीयपंथीयांकडून आशिर्वाद आपोआप मिळेल,” असे भावनिक आवाहनही त्यांनी केले. आपण पत्रकार असल्याचे नमूद करत, “आमच्या हक्कांसाठी शासनाशी संघर्ष सुरूच राहील,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

या गणेश जयंती महोत्सवात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. २० जानेवारी रोजी सकाळी गणेश पुराण कथाकार ह.भ.प. अशोक महाराज घायाळ यांनी तीन दिवसांची गणेश पुराण कथा सादर केली. दुपारी मोफत वैद्यकीय व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे यांनी कायदा व सुव्यवस्थेवर व्याख्यान दिले. सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दिलीप खंदारे यांनी विद्यार्थ्यांचे कर्तव्य या विषयावर मार्गदर्शन केले. २२ जानेवारी रोजी भरत महाराज जाधव यांच्या काल्याच्या किर्तनानंतर नेत्र तपासणी शिबिरातील ५० गरजूंना डॉ. भाग्यश्री श्रीनिवास खेडेकर यांच्या वतीने मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी श्रीनिवास खेडेकर, युवासेना नेते योगेश जाधव, माजी सरपंच महेंद्र पाटील, तेजराव देशमुख, बाबूराव मोरे, संदीप मगर, डी.एन. पांचाळ, गजानन देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सचिन खंडारे यांनी केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महाप्रसाद वितरण करण्यात आले.


📌 Related News

👉 हे आवश्यक करा..

अशाच सामाजिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण भागातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या.

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

साखरखेर्डा येथे सुसज्ज बसस्थानक उभारण्याची मागणी

७५ गावांच्या प्रवाशांचा प्रश्न कधी सुटणार? साखरखेर्ड्यात सुसज्ज बसस्थानकासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे साकडे

ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते अभिनेत्री व पत्रकार किरण वाघ यांना साई प्रेरणा गौरव पुरस्कार प्रदान करताना

शिर्डीत किरण वाघ यांचा दुहेरी गौरव! ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते ‘साई प्रेरणा गौरव पुरस्कार’

लोणार नगरपरिषदेत घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात निवेदन देताना डॉ. गोपालसिंह बछिरे व शिवसेना उ.बा.ठा. पदाधिकारी

घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात शिवसेना उ.बा.ठा. आक्रमक; 15 दिवसांत माहिती न दिल्यास लोणार नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा

मेहकरमध्ये एका रात्रीत ज्वेलर्स आणि मेडिकल स्टोअरमध्ये धाडसी चोरी

मेहकर हादरले! ‘आज माझे दुकान… उद्या कोणाचे?’ एका रात्रीत ज्वेलर्ससह मेडिकल स्टोअर फोडले; व्यापाऱ्यांची उडाली झोप

मेहकर न्यायालयातील बेलिफ 10 हजारांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात

न्याय देणाऱ्यांच्या दारातच भ्रष्टाचार! मेहकर न्यायालयात खळबळ; वॉरंट थांबवण्यासाठी बेलिफ 10 हजारांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा लागू झाल्यानंतरची माहिती

राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू; बळजबरीच्या धर्मांतरावर 7 वर्षांपर्यंत शिक्षा, जाणून घ्या काय आहेत नव्या तरतुदी

Leave a Comment