डोणगाव /प्रतिनिधी:
घाटबोरी शिवारात घडलेल्या दीड टन लोखंडी सळ्यांची चोरी प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. रस्ता कामासाठी साठवलेल्या सामानामधून ही दीड टन लोखंडी सळ्यांची चोरी झाल्याचे तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. स्थानिकांना कळताच दीड टन लोखंडी सळ्यांची चोरी या विषयावर चर्चा पसरली आणि गावकऱ्यांनी चौकशीची मागणी केली. या दीड टन लोखंडी सळ्यांची चोरी प्रकरणात दोघा शिक्षकांच्या सहभागाची चर्चा रंगली असून पुढील तपास सुरू आहे.
हे पण वाचा..
पेडगाव येथे गळफास लावून युवकाची आत्महत्या की हत्या? नातेवाईकांचा गंभीर आरोप.
वरुड–जनूना सिमेंट काँक्रिट रोडसाठी जानेवारी २०२५ पासून घाटबोरी घाटाजवळ लोखंडी सळ्या, पाईप व चॅनेल इत्यादी साहित्य मोठ्या प्रमाणात साठवण्यात होते. गेल्या काही दिवसांपासून हे साहित्य टप्प्याटप्प्याने गायब होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या, त्यावरून कामावरील अभियंता व कर्मचाऱ्यांनी साठवलेल्या ठिकाणी लक्ष ठेवणे सुरु केले.२६ नोव्हेंबर रोजी सकाळी पाहणीदरम्यान तुरीच्या वळीमध्ये, सोयाबीन कुटाराखाली व शेतात मातीमध्ये गाडून ठेवलेले सुमारे ₹90,000 किमतीचे दीड टन लोखंडी साहित्य सापडले. तसेच बायपास फाट्याजवळील दुसऱ्या ठिकाणी अंदाजे ₹75,000 किमतीचे चोरीचे साहित्यही हस्तगत झाले.हे पण वाचा..छत्रपती संभाजीनगरहून नोकरीच्या मुलाखतीवरून परतणाऱ्या नवविवाहित 26 वर्षीय तरुणाचा लोणी-लोणार रोडवर बोलेरो पिकअपच्या धडकेत मृत्यू.घटनेची चौकशी करताना साहित्य सापडलेल्या शेताचे नाते राजेश पुंजाजी पाखरे व संदीप पुंजाजी पाखरे या दोघांशी असल्याचे समोर आले. दोघांविरुद्ध डोणगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.