प्रवीण गरुडे/प्रतिनिधी धामणगाव बढे
धामणगाव बढे ढगफुटी पाऊस नुकसान: धामणगाव बढे, रिधोरा खंडोपंत, लिहा, पिंपळगाव देवी आणि कोल्ही गवळी परिसरात आज सकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे.
हे पण वाचा.
शेतकऱ्यांनो सावधान! महाराष्ट्रात येलो अलर्ट – पुढील ५ दिवस गडगडाटासह पावसाचा अंदाज.
“इतकं कष्ट करून उभं केलेलं पीक काही क्षणांत वाहून गेलं,” असं एका शेतकऱ्याने सांगितलं. स्थानिक प्रशासनाने तातडीने पंचनामे सुरू करावेत आणि शासनाकडून योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी सर्वत्र मागणी होत आहे.
सध्या या भागात पावसामुळे काही रस्तेही बंद झाले असून, शेतकऱ्यांना शेतात जाणं कठीण झालं आहे. हवामान खात्याने पुढील २४ तासांत आणखी पावसाचा इशारा दिला आहे.
👉अशा प्रकारच्या बुलढाणा जिल्ह्यातील बातम्यांसाठी kattanews.in लाभ आवश्यक भेट द्या.











