हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

शेती विक्रीच्या नावाखाली १७ लाखांचा घोटाळा! देऊळगावराजात दोघांना अटक

On: January 16, 2026 1:48 PM
Follow Us:
देऊळगावराजात शेती विक्री फसवणूक प्रकरणी पोलिसांनी आरोपी अटक केल्याची कारवाई
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

देऊळगावराजा |१६ जानेवारी २०२६

देऊळगावराजा तालुक्यात शेती विक्रीच्या नावाखाली १७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या शेती फसवणूक प्रकरणात देऊळगावराजा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. बनावट कागदपत्रे, खोटी माहिती आणि धमक्यांच्या आधारे हा शेती घोटाळा केल्याचा आरोप असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी देऊळगावराजा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२०, ४०६, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात वाल्मीक मारोती सांगळेसचिन वाल्मीक सांगळे (रा. अंतरवली राठी, ता. घनसावंगी, जि. जालना) यांना १३ जानेवारी रोजी अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी गणेश तुकाराम काकड (वय ३४, रा. गारगुंडी, ता. देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आंतरवली सराटी शिवारातील गट क्रमांक १०६ मधील ७० आर शेतजमीन विक्रीस उपलब्ध असल्याचे भासवून आरोपींनी संगनमताने व्यवहार केला. मात्र प्रत्यक्षात सदर शेतजमीन विक्रीस पात्र नसल्याचे निष्पन्न झाले.

या बनावट शेती व्यवहारासाठी फिर्यादीकडून १७ लाख रुपये घेण्यात आले. पैसे परत मागितल्यास खोट्या कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस दाखल करण्याची धमकी देत, फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना जीवितास धोका देण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षकांच्या परवानगीने गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास पोउपनि परविन पटेल करत आहेत. ठाणेदार ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास चालू आहे.


👉 वाचा Kattanews.in वर


📢 KattaNews सोबत रहा अपडेट

अशाच ग्रामीण, गुन्हेगारी आणि वास्तव बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या. बातमी आवडल्यास शेअर करा.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Mehkar Hotel Ekant police raid sex racket two women rescued

मेहकर बायपासवरील ‘हॉटेल एकांत’मध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात दोन महिलांची सुटका

मोहाडी शिवारात बिबट्याचा हल्ला, नीलगाई जखमी

मोहाडी शिवारात बिबट्याचा थरार! नीलगाईवर हल्ला; मादी बिबट्या व दोन पिल्लांचा वावर

Leave a Comment