हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

कामाच्या शोधात आलेल्या कापूस वेचणाऱ्या महिला मजुरांवर काळाची झडप; देऊळगाव राजातील भीषण अपघातात 2 महिला ठार

On: December 12, 2025 6:45 AM
Follow Us:
देऊळगाव राजा अपघात घटनास्थळाचे चित्र – महिला मजूर ठार आणि पाच जखमी
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

रामदास कहाळे/देऊळगाव राजा

देऊळगाव राजा अपघात आज सकाळी जाफराबाद रोडवर अत्यंत भीषण स्वरूपात घडला. या
अपघातात मजुरीसाठी आलेल्या दोन महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून पाच महिला गंभीर जखमी आहेत. कामाच्या शोधात परराज्यातून आलेल्या महिलांसाठी हा
देऊळगाव राजा तील अपघात अक्षरशः काळाची झडप ठरला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, हा
अपघात इतका अचानक घडला की पीडित महिलांना काहीच सुचण्याची उसंत मिळाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, परराज्य तसेच अमरावती जिल्ह्यातून कापूस वेचण्यासाठी आलेल्या महिला सकाळी पिंपळगावकडे जाण्यासाठी मालवाहू पिकअप (MH 38 E 2082) मध्ये बसत होत्या. तेवढ्यात मागून भरधाव वेगात आलेल्या एस.टी. बसने (MH 20 BL 2276) पिकअपला भीषण धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की दोन महिलांचा मृतदेह अक्षरशः चुराडा झाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात.

या अपघातात मृत झालेले — मायाबाई सुरज काजले (३२, राह. रामखेरा, बुऱ्हानपूर) आणि रिचाय काल्या कासदेकर (७२, राह. नांदुरी, धारणी, अमरावती). तर जखमी महिला: सुहाना प्रतिराम इपने (१६), खुशबू बबलू पालवी (१७), सुलोचना सहारे (३५), पुरुषाने इपने (२२) आणि नर्मदा सोनू इपने (४५). त्यांना प्राथमिक उपचारांनंतर जालना येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.

अपघातानंतर स्थानिक डॉक्टर डॉ. अक्षय गुठे, चालक सुभाष कणखर आणि समाधान आघाव यांनी घटनास्थळावर धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. पोलिस निरीक्षक ब्रह्मागिरी यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. देऊळगाव राजा पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

या घटनेनंतर कामाच्या शोधात आलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


👉 हे पण वाचा…


👉 हे आवश्य करा.

📌 ताज्या अपडेट्ससाठी Kattanews.in ला भेट द्या आणि नोटिफिकेशन ऑन करा!

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Mehkar Hotel Ekant police raid sex racket two women rescued

मेहकर बायपासवरील ‘हॉटेल एकांत’मध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात दोन महिलांची सुटका

Leave a Comment