हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

चिखली ठाणेदार भुषण गावंडेंच्या धडाकेबाज कारवाईत अट्टल चोरटा जेरबंद.

On: November 29, 2025 7:23 AM
Follow Us:
चिखली ठाणेदार भुषण गावंडे यांच्या धडाकेबाज कारवाईत अट्टल चोरटा जेरबंद झाल्याची घटना
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

चिखली प्रतिनिधी/विशाल गवई 

चिखली ठाणेदार भुषण गावंडेंच्या धडाकेबाज कारवाईत अट्टल चोरटा जेरबंद झाला असून, या चिखली ठाणेदार भुषण गावंडे यांच्या नेतृत्वाखाली डि बी पथकाने अल्प वेळात गुन्ह्याचा छडा लावला. या कारवाईमुळे चिखली ठाणेदार भुषण गावंडे यांच्या तपास कौशल्याचे पुन्हा एकदा कौतुक होत आहे. घटनेची सुरुवात फिर्यादीच्या घरासमोरून चोरी गेलेली हिरो होंडा मो.सा यापासून झाली आणि गुन्ह्याची माहिती मिळताच चिखली ठाणेदार भुषण गावंडे यांनी तत्काळ तपासाचे आदेश दिले. पहिल्याच टप्प्यात डि बी पथकाने संशयिताचा माग काढत चिखली ठाणेदार भुषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोरटा जेरबंद करण्यास यश मिळवले.

दिनांक २७/११/२०२५ रोजी फिर्यादी यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली की, त्यांची हिरो होंडा कंपनीची मो.सा क्र MH-28-U-4678 ही दिनांक २५ नोव्हेंबर रोजी रात्री घरासमोरून चोरीस गेली. मो.सा दिसेनाशी झाल्यानंतर फिर्यादी यांनी स्वतःच्या परिसरात व चिखली शहरात शोध घेऊनही काहीच सुगावा सापडला नाही, त्यामुळे गुन्हा नोंदवण्यात आला. तपासाची जबाबदारी डि बी पथकाकडे सोपवण्यात आली.

ठाणेदार भुषण गावंडे यांनी तपासासाठी विशेष सूचना दिल्यानंतर पथकाने माहितीदारांच्या मदतीने लक्ष्मी मार्केट परिसरात संशयित हालचाल करणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेला टॅब हा डॉक्टर प्रशांत चिंचोले यांचा चोरी गेलेला असल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपासात त्याच्या ताब्यातील मो.सा क्रमांक व चेचिस क्रमांक तपासले असता हीच मो.सा फिर्यादीच्या गुन्ह्यातील असल्याचे समोर आले.

हे पण वाचा.

आडगाव राजा गावाचा संताप उफाळला! BSNL–Airtel नेटवर्क ठप्प; ग्रामस्थांचा 7 दिवसांचा अल्टिमेटम

डि बी पथकाने आरोपीकडून एकूण ३२,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला – ७,००० रुपयांचा रिअलमी टॅब आणि २५,००० रुपयांची हिरो होंडा मोटारसायकल. या कारवाईचे श्रेय पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनासह पो.नि. भुषण गावंडे व डि बी पथकाला जाते.

हे पण वाचा.

मेहकर तालुक्यातील नायगाव दत्तापूर येथील स्टेट बँक फोडण्याचा धाडसी प्रयत्न! रात्री २ वाजता दोन चोरटे CCTV मध्ये कैद

या धडाकेबाज कामगिरीत डि बी पथकातील सफौ राजेंद्र काळे, पोना अमोल गवई, पोकॉ प्रशांत धंदर, पोकॉ अजय इटावा, राहुल पायघन व मपोकॉ रुपाली उगले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


👉 संपूर्ण जिल्ह्यातील ब्रेकिंग अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी KattaNews.in ला रोज भेट द्या!


Related News

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Mehkar Hotel Ekant police raid sex racket two women rescued

मेहकर बायपासवरील ‘हॉटेल एकांत’मध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात दोन महिलांची सुटका

Leave a Comment