हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

चिखली पोलीस ठाण्यात विशेष तक्रार निवारण शिबिरातून 329 तक्रारींचे निराकरण; नागरिकांचा विश्वास अधिक दृढ

On: December 26, 2025 8:08 AM
Follow Us:
चिखली पोलीस ठाण्यात आयोजित विशेष तक्रार निवारण शिबिरात 329 तक्रारींचे यशस्वी निराकरण
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

चिखली प्रतिनिधी / विशाल गवई

चिखली पोलीस ठाण्यात विशेष तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आल्याने सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
चिखली पोलीस ठाण्यात विशेष तक्रार निवारण शिबिर हा उपक्रम मा. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून
दिनांक 24 ते 27 डिसेंबर 2025 दरम्यान राबविण्यात आला आहे. या शिबिरामध्ये नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत, प्रभावी
आणि कायदेशीर चौकटीत निराकरण करण्यावर भर देण्यात आला आहे.

या कालावधीत चिखली पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला असून
कौटुंबिक वाद, जमीन विवाद, फसवणूक, सायबर गुन्हे, महिला तक्रारी तसेच किरकोळ वादांबाबत अर्ज प्राप्त झाले आहेत.
अनेक तक्रारींवर समुपदेशनाद्वारे तडजोड घडवून आणण्यात आली असून काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करून पुढील
कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या शिबिरात पोलीस अधिकारी तक्रारदारांच्या समस्या सखोलपणे समजून घेत योग्य मार्गदर्शन करत आहेत.
आतापर्यंत चिखली पोलीस ठाण्यात एकूण 329 नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून 329 तक्रारींचे
यशस्वी निराकरण करण्यात आले आहे. याशिवाय एकूण 1040 गुन्हे दाखल असून त्यापैकी 960 गुन्हे न्यायालयात
दाखल करून न्यायप्रविष्ठ करण्यात आले आहेत.

अशा प्रकारची तक्रार निवारण शिबिरे नियमितपणे आयोजित करण्यात येणार असून नागरिकांनी कोणत्याही भीतीशिवाय
आपल्या तक्रारी पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांनी केले आहे.

या उपक्रमामुळे पोलीस प्रशासनाबद्दल नागरिकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण होत असून
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास मोठी मदत होत आहे.

सदर शिबीर मा. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, मा. अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड,
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात
पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वाखाली चिखली पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यशस्वीपणे राबवत आहेत.


हे पण वाचा..


हे आवश्यक करा..

👉 अशाच विश्वासार्ह व स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in नियमित वाचा
👉 बातमी आवडल्यास शेअर करा व सपोर्ट करा.




 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment