हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

साखरखेर्डा येथे ३० वर्षीय मोटारसायकल मॅकनिक शाम अवचार यांची आत्महत्या; परिसरात हळहळ

On: December 25, 2025 8:22 AM
Follow Us:
साखरखेर्डा येथे ३० वर्षीय मोटारसायकल मॅकनिक शाम अवचार यांची आत्महत्या

रामदास कहाळे/प्रतिनिधी 

साखरखेर्डा आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. साखरखेर्डा येथे ३० वर्षीय मोटारसायकल मॅकनिक शाम अवचार यांनी आत्महत्या केल्याची घटना मंगळवार, २४ डिसेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली.
साखरखेर्डा आत्महत्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.मृतक शाम जयराम अवचार हा साखरखेर्डा येथील महात्मा ज्योतिबा फुले नगर परिसरात राहत होता. तो मोटारसायकल मॅकनिक म्हणून काम करत असून हातात कौशल्य असल्याने त्याचा व्यवसाय चांगला सुरू होता.
अनेक ग्राहक त्याच्याशी जोडले गेले होते.मात्र, दुपारी अचानक तो साखरखेर्डा ते लव्हाळा रोडलगत असलेल्या माजी सरपंच चंद्रशेखर शुक्ल यांच्या शेतातील क्रिकेट खेळण्याच्या जागेवर गेला. तेथील लिंबाच्या झाडाला दोर बांधून त्याने गळफास घेतल्याची माहिती समोर आली आहे.
रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात ही घटना आल्यानंतर त्यांनी तत्काळ युवकाला खाली उतरवून पाहिले; मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. या घटनेमुळे साखरखेर्डा गावात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे पीएसआय गणेश डोईफोडे, बिट जमादार बाजीराव खरात यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिंदखेड राजा येथे पाठविण्यात आला आहे.मृतकाचा मामेभाऊ विजय हरिभाऊ जैवळ यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.


📌 हे पण वाचा..


👉 वाचकांसाठी आवाहन

अशा दुर्दैवी घटनांबाबत तुमचे मत काय? खाली कमेंट करून प्रतिक्रिया द्या. स्थानिक, विश्वासार्ह आणि ब्रेकिंग मराठी बातम्यांसाठी KattaNews.in ला दररोज भेट द्या.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

Leave a Comment