हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

लोणी बुद्रुकमध्ये अनोखा सोहळा! १५ जोडप्यांनी हनुमान मूर्ती स्थापना; युवकांचा व्यसनमुक्ती संकल्प

Follow Us:
लोणी बुद्रुक येथे गुढी पाडव्याला हनुमान मूर्ती पुनर्स्थापना सोहळा

रिसोड |२२ मार्च २०२६

वाशीम जिल्ह्यातील लोणी बुद्रुक येथे गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हनुमान मंदिरातील मूर्तीची पुनर्स्थापना अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहात पार पडली. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

विधिवत पूजा, मंत्रोच्चार आणि धार्मिक परंपरेनुसार होम-हवन करून मूर्तीची पुनर्स्थापना करण्यात आली. संपूर्ण परिसर “जय हनुमान” च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. या सोहळ्यात गावातील तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे १५ जोडप्यांनी होम-हवनात सहभाग घेतला. सर्व धार्मिक विधी वेदशास्त्र पारंगत पुरोहित तुळशीदास गांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पद्धतीने पार पडले.

मंदिर परिसर आकर्षक सजावटीने नटविण्यात आला होता. फुलांची सजावट, ध्वज-ध्वजपताका आणि रोषणाईमुळे वातावरण अधिक प्रसन्न झाले होते. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत भजन-कीर्तनाद्वारे भक्तीमय वातावरण निर्माण केले.

या वेळी सखाराम महाराज संस्थानचे विश्वस्त कल्याण महाराज तसेच डॉ. प्रवीण लढ्ढा यांची प्रमुख उपस्थिती होती.

व्यसनमुक्तीचा संदेश : या धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने गावात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यात आली. समाधान बोडखे, संतोष बोडखे यांच्यासह अनेक युवकांनी दारू, तंबाखू आणि इतर व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प केला.


👉 अधिक स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट द्या आणि अपडेट रहा.

 

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

Leave a Comment