हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

लोणारमध्ये अवकाळीचा कहर! ८८४ हेक्टर पिकांचे नुकसान, १५९४ शेतकरी संकटात

On: March 22, 2026 5:27 PM
Follow Us:
लोणार तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले शेत

लोणार प्रतिनिधी |२२ मार्च २०२६

अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. रब्बी हंगामातील पिके काढणीच्या टप्प्यावर असताना झालेल्या या पावसामुळे ८८४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून १५९४ शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

बुधवारी (दि. १९) झालेल्या अवकाळी पावसासह काही भागात गारपीट व वादळी वाऱ्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, भुईमूग, टोमॅटो आणि टरबूज यांसारखी पिके पूर्ण वाढीवर असताना हा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.विशेषतः गहू व हरभरा काढणीच्या टप्प्यावर असताना झालेल्या पावसामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी काढलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांना तो वाचवण्यासाठी धावपळ करावी लागली.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

वझर आघाव, कासारी, येवती, चिंचोली सांगळे, पारडा दराडे, देऊळगाव कुंडपाळ, खुरमपूर, अजिसपुर, धायफळ या भागांमध्ये गारपीट व वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.

सलग दोन दिवस विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे टरबूज व कांदा पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्याने उभ्या पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे.

दरम्यान, या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून प्रशासनाकडून पंचनामे सुरू करण्याची मागणी होत आहे.

👉 अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी Kattanews.in ला फॉलो करा आणि अपडेट रहा.

👉 संबंधित बातम्या

विनायक कुटे

विनायक कुटे हे कट्टा न्यूज (Kattanews.in) चे प्रतिनिधी असून सामाजिक, प्रशासकीय आणि जनहिताच्या विषयांवर सातत्याने वार्तांकन करतात. नियमभंग, नागरिकांच्या समस्या, सार्वजनिक हिताशी संबंधित प्रश्न आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणे, ही त्यांच्या पत्रकारितेची ओळख आहे. सत्य, अचूक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मेहकरमध्ये एका रात्रीत ज्वेलर्स आणि मेडिकल स्टोअरमध्ये धाडसी चोरी

मेहकर हादरले! ‘आज माझे दुकान… उद्या कोणाचे?’ एका रात्रीत ज्वेलर्ससह मेडिकल स्टोअर फोडले; व्यापाऱ्यांची उडाली झोप

मेहकर न्यायालयातील बेलिफ 10 हजारांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात

न्याय देणाऱ्यांच्या दारातच भ्रष्टाचार! मेहकर न्यायालयात खळबळ; वॉरंट थांबवण्यासाठी बेलिफ 10 हजारांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा लागू झाल्यानंतरची माहिती

राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू; बळजबरीच्या धर्मांतरावर 7 वर्षांपर्यंत शिक्षा, जाणून घ्या काय आहेत नव्या तरतुदी

पाडळी शिंदे येथे करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणानंतर घटनास्थळी जमलेले ग्रामस्थ

करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून ५५ वर्षीय व्यक्तीचा खून; अंढेरा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन आरोपींना केली अटक

मर्दडी देवी मंदिर चोरी प्रकरणात CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास

देवीसमोर हात जोडले, नंतर त्याच गाभाऱ्यात चोरी केली! मर्दडीच्या जागृत देवस्थानातील धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद

चौथा ग्रामपंचायतीने स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाला अभ्यासिकेसाठी सभागृह सुपूर्द

चौथा ग्रामपंचायतीचा विद्यार्थीहिताचा निर्णय; कार्यालयाचे सभागृह वाचनालयाला सुपूर्द, अभ्यासिकेची झाली सुरुवात

Leave a Comment