चिखली प्रतिनिधी/विशाल गवई
मिळालेल्या माहितीनुसार, मानवी जिवितास तसेच पशु-पक्ष्यांच्या जिवितास गंभीर धोका निर्माण करणारा नायलॉन मांजा विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे समोर आले. या माहितीवर तत्काळ कारवाई करत डी.बी. पथकाने पोलीस स्टाफच्या मदतीने छापा टाकून शेख जहुर शेख गफुर (वय 49), रा. वार्ड क्रमांक 10, अंगुरचा मळा, चिखली, जिल्हा बुलढाणा यास जागीच ताब्यात घेतले.
आरोपीकडील कापडी पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये तीन लाल रंगाच्या नायलॉन मांजाच्या रिल आढळून आल्या. प्रत्येकी 250 रुपये किमतीच्या या रिल्सचा एकूण मुद्देमाल 750 रुपये इतका असून शासनाने नायलॉन मांजावर बंदी घातलेली असतानाही त्याची विक्री सुरू असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 125, 223 तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 5 व 15 अन्वये पोलीस स्टेशन चिखली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पो.नि. भुषण गावंडे यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकातील सफौ राजेंद्र काळे, मपोहेकॉ ललिता खरात, पोना अमोल गवई, पोकॉ प्रशांत धंदर, पोकॉ अजय इटावा, पोकॉ पंढरीनाथ मिसाळ यांनी ही कारवाई यशस्वी केली.
टीप : चिखली पोलीस स्टेशनतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाची विक्री किंवा वापर करू नये. नियमांचे उल्लंघन केल्यास विक्रेते व वापरकर्त्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
👉 हे आवश्य करा..
आपल्या परिसरातील अशाच महत्त्वाच्या गुन्हेगारी, प्रशासनिक आणि स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला रोज भेट द्या. ही बातमी शेअर करून इतरांनाही जागरूक करा.
🔗 हे पण वाचा..
- बुलढाण्यातील बोगस जात प्रमाणपत्र घोटाळा विधान परिषदेत गाजला; समाजकल्याण अधिकारी अनिता राठोडसह दोन अधिकारी निलंबित.
- खामगाव–जालना रेल्वेमार्गाला गती; मुख्यमंत्री फडणवीसांची समितीला ग्वाही — तातडीचा पाठपुरावा.
- अवैध मुरूम उत्खननावर कारवाईला हिंसक विरोध; कारवाईस गेलेल्या तहसीलदारांच्या पथकाला धमकी, मेहकर पोलिसांत गुन्हा दाखल.










