चिखली/प्रतिनिधी: विशाल गवई
चिखली (बुलढाणा): चिखली शहरातील राधाबाई खेडेकर विद्यालयात काल दि. ३० ऑक्टोबर रोजी शिंदे शिवसेनेच्या वतीने आयोजित आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या स्फोटक वक्तव्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.
“चिखली नगराध्यक्षपद शिंदे सेनेला द्या” — आमदारांचा थेट इशारा.
बैठकीदरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी थेट इशारा देत म्हटले,
“युती करायची असेल तर ती सन्मानजनक पद्धतीने करा. काही ठिकाणी युती आणि काही ठिकाणी नाही, हे आम्ही होऊ देणार नाही. चिखली नगराध्यक्षपद शिंदे सेनेला द्या, बदल्यात बुलढाण्याची जागा मी सोडतो.
”या विधानानंतर शिंदे गट आणि युतीतील पक्षांमध्ये चर्चेचा भडका उडाला आहे.गायकवाडांच्या या भूमिकेमुळे चिखली आणि बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
शिवसेनेची चिखलीत भव्य बैठक
या आढावा बैठकीला जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत, पक्ष निरीक्षक विजय अंभोरे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के, उपजिल्हाप्रमुख शिवाजीबापू देशमुख, तसेच शहर प्रमुख विलास घोलप यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीचं आयोजन शहरातील पदाधिकाऱ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केलं होतं.शहरातील शिवसेना पदाधिकारी पवन चिंचोले, राहुल शेलकर, विक्रांत नकवाल, राका मेहेत्रे, अमर सुसर, सतीश हिवाळे आदींनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोठं योगदान दिलं.
हे पण वाचा.
धक्कादायक! काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बेडरूममध्ये पोलिसांची घुसखोरी — सरकारवर
वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते शिंदे सेनेत
या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष अर्जुन बोर्डे, व्यापारी असोसिएशनचे राकेश चोपडा, तसेच सचिन चोरघडे, समाधान बांडे, हेमंत खेडेकर (माजी नगरसेवक) या अनेक स्थानिक नेत्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.या नव्या प्रवेशामुळे चिखलीत शिंदे गटाची ताकद वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
युतीवर अनिश्चिततेचे ढग
सध्या बुलढाणा जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी युतीचे समीकरण अजूनही निश्चित झालेले नाही.काही ठिकाणी युतीची शक्यता आहे, तर काही ठिकाणी पक्ष स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहेत.
याच पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी दिलेला हा स्पष्ट इशारा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.त्यांनी पुढे सांगितले,
“युतीचा निर्णय आमचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार आणि जिल्हा कमिटी मिळून घेतील. मात्र, सन्मानपूर्वक जागावाटप न झाल्यास आम्ही स्वबळावर लढायला तयार आहोत.”
या घोषणेनंतर चिखली आणि बुलढाण्यातील राजकीय तापमान अचानक वाढले आहे.
चिखलीत शिंदे शिवसेनेची स्वबळावर तयारी
गायकवाडांच्या भूमिकेमुळे आता शिंदे शिवसेना चिखलीत स्वबळावर निवडणुकीच्या तयारीला लागली आहे.कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, शहरातील विविध विभागांमध्ये संघटन मजबूत करण्याचे काम सुरू झाले आहे.राजकीय निरीक्षकांच्या मते, ही भूमिका स्थानिक युतीच्या चर्चेला नवीन वळण देऊ शकते.
बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या राजकीय अपडेट्ससाठी KattaNews.in ला दररोज भेट द्या!”











