चिखली, बुलढाणा|३ मार्च २०२६
चिखली मोटारसायकल चोरी प्रकरणात मोठा खुलासा झाला असून Hero HF Deluxe चोरी प्रकरणातील आरोपीला अवघ्या 7 दिवसांत जेरबंद करण्यात आले आहे. चिखली येथील विश्रामगृहासमोरून चोरीस गेलेली MH 28 AW 2521 क्रमांकाची मोटारसायकल डी.बी. पथकाच्या कारवाईत जप्त करण्यात आली. या Chikhli crime news मुळे परिसरात खळबळ उडाली होती.
तक्रारीवरून अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 303 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक भुषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने तपास सुरू केला.
गुप्त माहितीच्या आधारे आरोपी जालना जिल्ह्यातील भारज बु. ता. जाफराबाद येथे असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने तत्काळ कारवाई करत संत सावता माळी भवन परिसरात छापा टाकला. तेथे सदर मोटारसायकल घरासमोर उभी आढळून आली.
चौकशीदरम्यान कृष्णा आत्माराम पवार (वय 24 वर्ष) याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र इंजिन व चेसीस नंबर तपासल्यावर तीच चोरीस गेलेली गाडी असल्याचे स्पष्ट झाले. विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने चोरीची कबुली दिली.
सदर आरोपीस ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस प्रशासनाचे मार्गदर्शन
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
Related News
- Buldhana Crime: १५ हजारांच्या लाचप्रकरणी अप्पर कोषागार अधिकारी रंगेहात अटक | ACB Buldhana Action
- पळसखेड चक्का येथे महाजल योजनेचा फज्जा! नळ कोरडे, महिलांची पाण्यासाठी वणवण
- महाराष्ट्रात वाहन चोरीचे प्रमाण वाढले? ताजे आकडे समोर
हे आवश्यक करा
अशाच ताज्या गुन्हेगारी बातम्या, ब्रेकिंग अपडेट्स आणि स्थानिक घडामोडींसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.
👉 आमची वेबसाईट बुकमार्क करा
👉 मित्रांसोबत शेअर करा
👉 Kattanews.in फॉलो करा












