हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

चिखली–लव्हाळा रस्त्यावर रोड रॉबरीचा थरार! रस्ता अडवून १५ वाहनांवर दगडफेक; साखरखेर्डा पोलिसांचा रात्रभर कडेकोट बंदोबस्त

On: January 18, 2026 11:14 AM
Follow Us:
चिखली–लव्हाळा रस्त्यावर रात्री वाहनांवर दगडफेक झाल्यानंतरचा परिसर आणि पोलिस बंदोबस्त
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

चिखली|१८ जानेवारी २०२६

चिखली–मेहकर मार्गावरील लव्हाळा नजीक गुरुवारी रात्री चिखली–लव्हाळा रस्त्यावर रोड रॉबरीचा थरार अनुभवायला मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली.

पाटोदा फाट्याजवळ अज्ञात चोरट्यांनी रस्ता अडवून जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.
या घटनेत तब्बल १५ वाहनांच्या काचा फुटल्याने रात्री प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

प्राप्त माहितीनुसार, चोरट्यांनी हायवेवर दगड टाकून तसेच प्रवासी निवाऱ्यातील बाकडे रस्त्यावर आडवे ठेवून वाहने थांबवण्याचा प्रयत्न केला.
मात्र काही वाहनचालकांनी प्रसंगावधान राखत गाड्या न थांबवता वेगात पुढे नेल्याने मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, प्रवासी निवाऱ्याच्या आडून जाणाऱ्या वाहनांवर जोरदार दगडफेक करण्यात आल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले.

याच वेळी सैलानी येथे दर्शनासाठी जात असताना साखरखेर्डा येथील बाबुसेठ कुरेशी यांच्या चारचाकी वाहनाचे टायर फुटले.
मात्र वाहनात क्रूझरमध्ये ८ ते १० जण असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी पळ काढला आणि रोड रॉबरीचा प्रयत्न फसला.

घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड, दुय्यम ठाणेदार गणेश डोईफोडे,
पोलीस कॉन्स्टेबल विनायक परिहार यांच्यासह साखरखेर्डा, चिखली पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
रात्रभर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवून शोधमोहीम राबविण्यात आली; मात्र संशयित चोरटे अंधाराचा फायदा घेत फरार झाले.

रोड रॉबरीचा प्रयत्न फसल्याने चोरटे आजूबाजूच्या गावांमध्ये चोरीचा प्रयत्न करू शकतात,
या शक्यतेने पोलिसांनी परिसरातील पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे पदाधिकारी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
रात्रीच्या वेळी अनोळखी ठिकाणी वाहन थांबवू नये, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

याच परिसरातील सवडद येथील ग्रामविकास अधिकारी गौतम गवई यांच्या शेतातून कोंबड्या, एक क्विंटल कापूस आणि सोयाबीन चोरीला गेल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला असून
याबाबत साखरखेर्डा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सलग घडलेल्या घटनांमुळे जिल्ह्यातील हायवे सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हे पण वाचा.


 Katta News सोबत अपडेट रहा:
अशाच विश्वासार्ह, थरारक आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी Kattanews.in नियमित वाचा.
आपल्या परिसरातील बातम्या, व्हिडिओ किंवा माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment