KattaNews नवीन जाहिरात KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

देऊळगाव राजा श्री बालाजी महाराज यात्रा उत्सवाला ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ; २० ऑक्टोबरला दसरा पालखी मिरवणूक

On: October 5, 2026 7:10 AM
Follow Us:
देऊळगाव राजा श्री बालाजी महाराज यात्रा उत्सव २०२६

देऊळगाव राजा | प्रतिनिधी : मनोहर खंदारे

KattaNews जाहिरात 1

ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेची ओळख असलेल्या देऊळगाव राजा येथील श्री बालाजी महाराजांच्या वार्षिक यात्रा उत्सवाची भाविकांना आता प्रतीक्षा लागली आहे. महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागांतून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक श्री बालाजी महाराजांच्या दर्शनासाठी देऊळगाव राजा येथे येतात. यंदाच्या यात्रा उत्सवाला ११ ऑक्टोबर २०२६ रोजी घटस्थापनेने सुरुवात होणार असून, त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.

KattaNews जाहिरात 2

यात्रेतील घटस्थापना आश्विन शु. १, रविवार, ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यानंतर सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी मंडपोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात्रेतील प्रमुख आकर्षण असलेली दसरा पालखी मिरवणूक मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीपासून सुरू होऊन बुधवार, २१ ऑक्टोबरपर्यंत होणार आहे.

KattaNews जाहिरात 3

तसेच लळीत उत्सव गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.४५ वाजता होणार आहे. त्यामुळे या काळात देऊळगाव राजा येथे धार्मिक वातावरण निर्माण होणार असून, भाविकांचीही मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

KattaNews जाहिरात 4

यंदाचा आश्विन यात्रा उत्सव ११ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत होणार आहे. त्यानंतर कार्तिक यात्रा उत्सव १० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत भाविकांनी श्री बालाजी महाराजांचे दर्शन आणि प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री बालाजी महाराज संस्थानचे वंशपरंपरागत विश्वस्त राजे विजयंसिंह जाधव आणि व्यवस्थापक किशोर बीडकर यांनी केले आहे.

यात्रा उत्सव जवळ येत असल्याने संस्थानच्या वतीने तयारीलाही वेग आला आहे. श्री बालाजी महाराजांच्या उत्सवाची माहिती जास्तीत जास्त भाविकांपर्यंत पोहोचावी, यासाठी पत्रकार बांधव व भगिनींच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही वृत्तपत्रे आणि विविध माध्यमांच्या माध्यमातून यात्रा उत्सवाचा प्रचार-प्रसार करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

याशिवाय सर्वे नंबर ९८ वरील यात्रा नियोजनासाठी जागावाटप समितीच्या सदस्यांची अंतर्गत सहविचार सभा घेण्यात आली. यात्रेदरम्यान येणाऱ्या भाविकांची संख्या आणि उपलब्ध जागा लक्षात घेऊन नियोजन करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

दरम्यान, यात्रेचे नियोजन अधिक व्यवस्थित व्हावे आणि विविध विभागांची जबाबदारी स्पष्टपणे निश्चित करता यावी, यासाठी संस्थानने प्रशासनाकडेही पाठपुरावा सुरू केला आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार यात्रेचा व्यवस्थापन आराखडा आणि प्रमाणित कार्यपद्धती (SOP) जिल्हाधिकारी यांनी प्रमाणित करावी, तसेच संबंधित विभागांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या निश्चित करून यात्रा आणि उत्सवासाठी आवश्यक परवानग्या द्याव्यात, अशी मागणी श्री बालाजी संस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री बालाजी महाराजांच्या यात्रेला भाविकांची मोठी उपस्थिती राहण्याची अपेक्षा आहे. यात्रा उत्सवाच्या निमित्ताने देऊळगाव राजा शहरात धार्मिक वातावरण पाहायला मिळणार असून, भाविकांसह स्थानिक नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

📲 बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी KattaNews WhatsApp ग्रुप जॉइन करा


🟢 WhatsApp Group Join करा

📰 Related News

 

पुण्याहून हिवरखेडकडे निघाला, पण अंढेरा घाटात काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू.

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात; सिंदखेड राजा मतदारसंघात ३-४ ऑक्टोबरला विशेष मतदार नोंदणी कॅम्प

“साहेब, काडही १० किलो भरत नाही; सोयाबीनचे दाणे कोठे शोधणार?” साखरखेर्डा परिसराततील शेतकऱ्यांची व्यथा

 

 

मनोहर खंदारे

मनोहर खंदारे हे कट्टा न्यूजचे प्रतिनिधी असून महाराष्ट्रातील स्थानिक, सामाजिक, राजकीय आणि ग्रामीण भागातील ताज्या घडामोडींवर बातम्या देतात. स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या समस्या आणि महत्त्वाच्या घटनांची अचूक व विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे ते काम करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

देऊळगाव राजा येथे शासकीय जमिनीवरील २०० ब्रास मुरूम चोरी प्रकरण

देऊळगाव राजात शासकीय जमिनीवरून २०० ब्रास मुरूम गायब! महसूल विभागाची पोलिसांत धाव

मेहकर-जानेफळ रोडवर फर्धापूरजवळ गांजा वाहतुकीविरोधात पोलिसांची कारवाई

मेहकरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली गांजाची वाहतूक पकडली; एका महिलेसह सात आरोपी

सिंदखेडराजा नगरपरिषद प्रशासनाविरोधात सफाई कामगारांचे भिकमांगो व जेलभरो आंदोलन

सिंदखेडराजा नगरपरिषद प्रशासनाविरोधात सफाई कामगारांचे आंदोलन; भिकमांगो अन् जेलभरोचा इशारा!

मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील १७ वर्षीय नवलच्या मृत्यूची बातमी

चार बहिणींचा एकुलता एक आधार हरपला! धामणगाव बढे येथील १७ वर्षीय नवलचा चक्कर आल्याने मृत्यू

जिजाऊंची जन्मभूमी सिंदखेड राजा पर्यटन विकासासाठी डॉ. शशिकांत खेडेकर यांची पर्यटन मंत्र्यांकडे मागणी

जिजाऊंच्या जन्मभूमीचा विकास होणार? सिंदखेड राजासाठी डॉ. शशिकांत खेडेकरांचे पर्यटन मंत्र्यांना पत्र; केल्या ३ प्रमुख मागण्या!

चिखली तालुक्यातील कोलारा शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात १२ बकऱ्या ठार

चिखली तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ! संरक्षण जाळीखालून गोठ्यात शिरकाव; १२ बकऱ्यांचा फडशा, शेतकऱ्याचे २ लाखांचे नुकसान!

Leave a comment