चिखली / मंगेश भोलवनकर
चिखलीत झालेल्या परिवर्तन सभेला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद अभूतपूर्व होता आणि चिखली शहराच्या राजकीय समीकरणात मोठा बदल दिसू लागला आहे. या परिवर्तन सभेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्राचार्य निलेश गावंडे यांना दिलेला ठोस पाठिंबा संपूर्ण चिखलीत चर्चेचा विषय बनला. चिखलीच्या विकासासाठी अजितदादा पवार यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या, तर प्राचार्य निलेश गावंडे यांनी चिखलीला आधुनिक सुविधा देण्याचा निर्धार व्यक्त केला. या परिवर्तन सभेमुळे आगामी निवडणुकीत नवा कल निर्माण झाला आहे.
राजा टॉवर परिसरात आयोजित सभेत युवक, महिला आणि सर्व समाज घटकांची उपस्थिती उत्साहवर्धक होती. अनेकांच्या मते ही सभा चिखली नगरपरिषद निवडणूक 2025 चा निर्णायक टर्निंग पॉइंट ठरू शकते.
सभेत अजितदादा पवार म्हणाले, “चिखलीच्या सर्वांगीण विकासासाठी प्राचार्य डॉ. निलेश गावंडेंनाच शहराची जबाबदारी द्या. घाबरू नका… राज्य सरकार तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहे.”
त्यांच्या प्रमुख घोषणा:
- पाणीपुरवठा सुधारणा
- रस्ते व नाले विकास
- कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता
- स्मार्ट सुविधा आणि आधुनिक पायाभूत कामे
प्राचार्य निलेश गावंडे यांचा विकास दृष्टिकोन
“शिक्षक म्हणून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवल्यानंतर आता चिखलीचे भविष्य घडवायचे आहे,” असे सांगत त्यांनी रोजगार, स्वच्छता, रस्ते, शिक्षण आणि स्मार्ट प्रणाली यांना प्राधान्य देण्याची घोषणा केली.
सभेतील प्रचंड गर्दी आणि महायुतीचे एकत्रित नेतृत्व पाहता अनेकांनी हेच स्वीकारले की ही सभा अंतिम निकालावर मोठा प्रभाव टाकणार आहे.
📩 ताज्या बातम्यांसाठी व विविध योजनांच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.











