हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
दीड टन लोखंडी सळ्यांची चोरी! दोन शिक्षकांवर गiQOO 15 Price in India: जबरदस्त फीचर्ससह लॉन्च, किंमत जाणून Reel बनविताना भीषण अपघात! युवकाचा रेल्वेखाली कटबुलढाणा : पाडळी रोडवर भीषण अपघात; अज्ञात वाहनाBuldhana : बुलढाण्यात अवैध गर्भलिंग चाचणी रॅकेटचा लाडकी बहीण योजना: 2 मिनिटांत मोबाईलवर घरबसल्य

दुसरबीड जवळ भीषण अपघात; लग्नावरून परतणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील दोन युवकांचा जागीच मृत्यू, साखरखेर्डा गावात शोककळा!

On: November 1, 2025 11:23 AM
Follow Us:

सिंदखेडराजा (जि. बुलढाणा):

बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड परिसरात ३१ ऑक्टोबर रोजी रात्री भीषण अपघात झाला. या घटनेत लग्न समारंभावरून परतणाऱ्या साखरखेर्डा येथील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला असून, संपूर्ण साखरखेर्डा गावात शोककळा पसरली आहे.

सविस्तर माहितीनुसार, साखरखेर्डा येथील अल्ताफ शेख अक्रम आणि आरीफ तांबोळी हे दोघे मोटारसायकल (क्रमांक MH-28/4029) वरून दुसरबीड येथे लग्न समारंभासाठी गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री दोघे साखरखेर्ड्याकडे परत येत असताना दुसरबीडजवळील उड्डाणपुलाजवळ त्यांच्या दुचाकीचा डिव्हायडरवर जोरदार धडक बसली.

धडक एवढी भीषण होती की दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. किनगावराजा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात पाठवले.या दुर्देवी अपघातामुळे संपूर्ण साखरखेर्डा गावावर शोककळा पसरली आहे.

हे‌ पण वाचा.

चिखली पोलिसांची मोठी कारवाई! डिझेल चोरी करणाऱ्या अटल टोळीचा पर्दाफाश; ५ आरोपी तुरुंगात

गावातील नागरिक, मित्रपरिवार व नातेवाईक मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल झाले होते. सोशल मीडियावरही अनेकांनी दोन्ही युवकांना श्रद्धांजली वाहिली आहे.

👉 “अशाच आणखी स्थानिक आणि ब्रेकिंग मराठी बातम्यांसाठी kattanews.in ला भेट द्या!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!