भोकरदन प्रतिनिधी/संजीव पाटील
Breaking: चोर्हाळा येथील 40 वर्षीय तरुण शेतकरी विजय नवलसिंग महाले यांनी कर्जबाजारीपणा, पिकांचे प्रचंड नुकसान आणि अतिवृष्टीच्या संकटामुळे खोल निराशेत जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केली.
शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता तणनाशक फवारणीसाठी आणलेले विषारी औषध त्यांनी शेतातच पिण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांना भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र शनिवारी संध्याकाळी 7 वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
त्यांचे वडील तीन वर्षांपूर्वी निधन झाले होते आणि जमीन फेरफारही अद्याप त्यांच्या नावावर झाला नव्हता. अतिवृष्टीमुळे दिड एकर शेती पाण्याखाली गेली होती. सतत वाढत जाणारा कर्जाचा भार, न पिकणारी शेती आणि निसर्गाची अनिश्चितता यामुळे ते प्रचंड तणावाखाली होते.
त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, मुलगी तसेच कुटुंबातील इतर सदस्य असा मोठा परिवार आहे. या घटनेने संपूर्ण चोर्हाळा गावात व भोकरदन तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
हे पण वाचा.










