तालुका प्रतिनिधी – संजीव पाटील,भोकरदन
भोकरदन (जालना) : भोकरदन पंचायत समितीचे नवीन गटविकास अधिकारी डॉ. श्रीकृष्ण वेणीकर यांनी आज, दिनांक 28 ऑक्टोबर रोजी पदभार स्वीकारला.
त्यांनी प्रभारी गटविकास अधिकारी महेंद्र साबळे यांच्या हस्ते अधिकृतपणे कार्यभार स्विकारत ग्रामविकास विभागातील विकासकामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली.
या प्रसंगी दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी रविंद्र देशपांडे यांनी नुतन गटविकास अधिकारी डॉ. वेणीकर आणि मावळते अधिकारी महेंद्र साबळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
हेही वाचा
Gold Price Today : एकाच दिवसात सोन्याच्या दरात तब्बल ₹4000 ची घसरण, आजचे नवीन दर जाणून घ्या!
स्थानिक प्रशासनात डॉ. वेणीकर यांच्या नियुक्तीमुळे पंचायत समितीच्या विकासकामांना नवी गती मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. तसेच, ग्रामीण भागातील योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांनी पारदर्शक प्रशासनावर भर देण्याचे आश्वासन दिले आहे.











