हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

दिव्यांग दाम्पत्यावर कोसळले दुःख! आव्हा शिवारात शेतात करंट लागून ५२ वर्षीय महिला मजूराचा मृत्यू

On: January 8, 2026 6:46 AM
Follow Us:
आव्हा शिवारात शेतात पडलेल्या विद्युत तारेमुळे महिला मजूराचा मृत्यू
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

मोताळा/प्रवीण गरुडे

आव्हा शिवारात आज सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. शेतात करंट लागून महिला मजूराचा मृत्यू झाल्याची ही हृदयद्रावक घटना असून, मोलमजुरीवर जगणाऱ्या दिव्यांग कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेतात कामासाठी जात असताना शेतात करंट लागून महिला मजूराचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच शेतात करंट लागून महिला मजूराचा मृत्यू झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

कोल्ही गवळी येथील कमलबाई डिगंबर भारती (वय ५२) या महिला इतर महिलांसोबत आव्हा शिवारातील माकोडी येथील शेतकरी डिगंबर सुरेश बढे यांच्या शेतात कामासाठी जात होत्या. नेहमीच्या रस्त्यावर मधमाशा उठल्यामुळे पर्यायी मार्गाने जात असताना मक्याच्या शेतात पडलेल्या विद्युत प्रवाहित तारेला त्यांचा स्पर्श झाला. या दुर्घटनेत शेतात करंट लागून महिला मजूराचा मृत्यू घटनास्थळीच झाला.

कमलबाई भारती यांच्यासोबत असलेल्या इतर महिला घाबरून दूर पळाल्याने बचावल्या. मृत कमलबाई तसेच त्यांचे पती डिगंबर भारती हे दोघेही दिव्यांग असून भूमिहीन आहेत. मोलमजुरीवर अवलंबून असलेल्या या कुटुंबाला कोणताही आधार नसल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेनंतर काही काळ शेतकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाल्याने तणाव निर्माण झाला होता. धामणगाव बढे पोलीस ठाण्याचे ठाणेदार नागेश जायले, कोल्हीचे सरपंच शिवाजीराव बोराडे, माजी सभापती अवि पाटील, आव्हा सरपंच स्वप्नील घोंगटे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केली.

मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मलकापूर येथे पाठवण्यात आला असून धामणगाव बढे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, दिव्यांग कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


👉 अशाच ग्रामीण भागातील सत्य, संवेदनशील आणि ताज्या बातम्यांसाठी Kattanews.in ला  Follow करा.


 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Mehkar Hotel Ekant police raid sex racket two women rescued

मेहकर बायपासवरील ‘हॉटेल एकांत’मध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात दोन महिलांची सुटका

मोहाडी शिवारात बिबट्याचा हल्ला, नीलगाई जखमी

मोहाडी शिवारात बिबट्याचा थरार! नीलगाईवर हल्ला; मादी बिबट्या व दोन पिल्लांचा वावर

Leave a Comment