हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

अनुष्काला न्याय द्या! संशयास्पद मृत्यू प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी आज चिखलीत सकल मातंग समाजाचा कॅन्डल मार्च

On: January 9, 2026 12:20 PM
Follow Us:
अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ चिखलीत काढण्यात आलेला कॅन्डल मार्च
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

चिखली /विशाल गवई

लातूर जिल्ह्यातील मौजे काटा (ता. औसा) येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या वस्तीगृहामध्ये इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या निरागस अनुष्का पाटोळे (वय १२) हिचा ३ जानेवारी रोजी रात्री झालेला संशयास्पद मृत्यू संपूर्ण समाजमनाला हादरवून टाकणारा आहे. अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरण हे हत्या आहे की आत्महत्या, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या प्रकरणातील सत्य बाहेर यावे, दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि अनुष्काला न्याय मिळावा, या प्रमुख मागणीसाठी चिखली तालुक्यातील सकल मातंग समाज एकवटला असून आज दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ८ वाजेदरम्यान शांत, शिस्तबद्ध आणि विना आवाज कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले आहे.

कॅन्डल मार्चची सुरुवात सायंकाळी ५:३० वाजता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून होणार आहे. यानंतर अनुष्काला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असून, हातात मेणबत्त्या घेऊन पोलीस लाईन – सिंधी कॉलनी चौक – अंजली टॉकीज मार्गे फुले–शाहू–आंबेडकर वाटिका, जयस्तंभ चौक येथे मार्चचा समारोप होणार आहे.

हे पण वाचा..

सहकार क्षेत्रात मोठी खळबळ! बुलडाण्यातील १३ पतसंस्थांचे परवाने रद्द होण्याच्या मार्गावर; सभासदांच्या ठेवींवर काय परिणाम होणार?

या शांततामय कॅन्डल मार्चद्वारे केवळ संवेदना व्यक्त करण्याचा उद्देश नसून, प्रशासनाचे लक्ष वेधून अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम भूमिका सकल मातंग समाजाच्या वतीने मांडण्यात आली आहे.

हे पण वाचा..

लाडकी बहिणी योजनेचा गैरवापर उघड! बुलढाण्यात Ladki Bahin Yojana प्रकरणी सहा कर्मचाऱ्यांकडून 99 हजारांची वसुली

या कॅन्डल मार्चमध्ये सर्व नागरिकांनी, सामाजिक संघटनांनी व न्यायप्रिय व्यक्तींनी मोठ्या संख्येने सहभागी होत शांतता, शिस्त व सौहार्द राखावे, असे आवाहन सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

हे पण वाचा..

lonar lake:लोणार सरोवरातील जलपातळी धोक्याच्या टप्प्यावर !कमळजा मातेच्या मुखवट्याला पाण्याचा स्पर्श

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment