हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

अंढेरा पोलिसांची मोठी कारवाई! रेतीची अवैध वाहतूक करणारे २ टिप्पर पकडले; ८ ब्रास रेतीसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

On: August 29, 2026 8:04 AM
Follow Us:
अंढेरा पोलिसांनी पकडलेले अवैध रेती वाहतूक करणारे दोन टिप्पर
अंढेरा |विशाल गवई 

अवैध रेती वाहतुकीवर अंढेरा पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन टिप्पर पकडले आहेत. वाकी बुद्रुक फाट्यावर पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली. दोन्ही टिप्परची तपासणी केली असता प्रत्येकी ४ ब्रास याप्रमाणे एकूण ८ ब्रास अवैध रेती आढळून आली. दोन टिप्पर आणि रेती असा सुमारे ४० लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी दोन्ही टिप्पर चालकांविरुद्ध अंढेरा पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

२५ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ७.२० वाजता अंढेरा पोलिसांचे पथक परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी वाकी बुद्रुक फाट्याजवळ देऊळगाव महीकडून येणारे पांढऱ्या रंगाचे दोन टिप्पर पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी इशारा करून दोन्ही टिप्पर थांबवले. त्यानंतर वाहनांची तपासणी केली असता दोन्ही टिप्परमध्ये रेती आढळून आली. तपासणीमध्ये प्रत्येक टिप्परमध्ये ४ ब्रास अशा एकूण ८ ब्रास रेतीची अवैध वाहतूक केली जात असल्याचे समोर आले.

पहिल्या प्रकरणात टिप्पर क्रमांक MH 13 DQ 5278 चा चालक नितीन संजन इंगळे (वय २९, रा. भानखेड, ता. चिखली) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. तर दुसऱ्या प्रकरणात टिप्पर क्रमांक MH 28 CF 8952 चा चालक सतीश चिंधाजी सरोदे (वय ३५, रा. नागणगाव, ता. देऊळगाव राजा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही प्रकरणांत भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम ४८ (७) (८) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईत दोन टिप्पर आणि त्यामधील एकूण ८ ब्रास अवैध रेती असा सुमारे ४० लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

ही कारवाई प्रभारी ठाणेदार भरत चपाईतकर, उपनिरीक्षक दिनेश घुगे, नितीन पुसे आणि अमोल रोरे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास एएसआय गणेश देढे करीत आहेत.

📲 अंढेरा आणि बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा

स्थानिक बातम्या, ताजे अपडेट्स आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

👉 WhatsApp Group Join करा

📢 तुमच्या परिसरातील बातमी आमच्यापर्यंत पोहोचवा

बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या, पोलिस कारवाई आणि स्थानिक घडामोडींसाठी KattaNews.in वरील संबंधित बातम्या वाचा.

📰 Related News

चिखली-खामगाव मार्गावर भीषण अपघात! बस-टिप्परची जोरदार धडक; टिप्परचा चुराडा

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर! अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचे पैसे थेट खात्यात जमा होणार; 10.78 कोटींचा निधी मंजूर

चिखलीत मुलींच्या छेडछाडीविरोधात उपनगराध्यक्षांचा पोलिसांना इशारा; “कारवाई करा, अन्यथा महिलांना घेऊन रस्त्यावर उतरू!”

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

MPSC पेपरफुटी प्रकरणात अवर सचिवासह 6 जणांना अटक

MPSC पेपरफुटीचा धक्कादायक भांडाफोड; अवर सचिवासह 6 जणांना अटक, प्रेमभंगातून फुटला पेपर

हिवरा खुर्द येथे विद्यार्थ्याला शिक्षकाकडून मारहाण केल्याचा आरोप

‘दहा वेळा शून्य हा मोबाइल नंबर होऊ शकतो का?’ प्रश्न विचारला अन् शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप; जानेफळ पोलिसांत तक्रार

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजात पडक्या घरात अर्भकाचा मृतदेह

देऊळगाव राजात काळीज पिळवटून टाकणारी घटना! पडक्या घरात अर्भकाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ उकलण्याचे पोलिसांसमोर आव्हान

शेतकरी कर्जमाफीसाठी रविकांत तुपकरांचे मुंबई आंदोलन

शेतकरी कर्जमाफीसाठी रविकांत तुपकरांचा मुंबईत एल्गार; पोलिसांची नोटीस, तरी २७ ऑगस्टचे आंदोलन अटळ

धाड चाकू हल्ला प्रकरणातील आरोपीला अटक

चाकू हल्ल्याने धाड हादरले! दोन जणांवर वार करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक; न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी

देऊळगाव राजा येथील श्री व्यंकटेश महाविद्यालयातील विद्यार्थी दीक्षारंभ कार्यक्रम

देऊळगाव राजा : श्री व्यंकटेश महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न

Leave a Comment