हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

चिखलीत मुलींच्या छेडछाडीविरोधात उपनगराध्यक्षांचा पोलिसांना इशारा; “कारवाई करा, अन्यथा महिलांना घेऊन रस्त्यावर उतरू!”

On: August 28, 2026 12:22 AM
Follow Us:
चिखलीतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडे निवेदन देताना उपनगराध्यक्ष वैशालीताई खेडेकर

चिखली : विशाल गवई 

चिखली शहरातील शाळा, महाविद्यालये आणि शिकवणी वर्गांच्या परिसरात विद्यार्थिनींची छेडछाड, टवाळखोरी आणि दादागिरीच्या तक्रारी समोर आल्याने विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकारांना तातडीने आळा घालून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी चिखली नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष सौ. वैशालीताई कपिल खेडेकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात जाऊन ठाणेदारांना निवेदन दिले.

शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत काही युवक दुचाकींवरून शाळा परिसरात घोळका करून उभे राहत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थिनी बाहेर पडताच त्यांच्या मागे दुचाकीने फिरणे, अश्लील शेरेबाजी करणे आणि छेडछाड करण्याचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे खेडेकर यांनी सांगितले.

काही युवक विद्यार्थ्यांशी विनाकारण वाद घालून दादागिरी करीत असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालये आणि शिकवणी वर्गांच्या परिसरात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे निवेदनातून सांगण्यात आले.

विशेषतः सायंकाळी ५ ते ७ वाजण्याच्या सुमारास पारधी बाबा मंदिर परिसरातील शिकवणी वर्गांजवळ दुचाकींवरून फिरणाऱ्या टवाळखोर युवकांचा वावर वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे. क्लासेस सुटण्याच्या वेळेत विद्यार्थिनींची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या परिसरात पोलिसांची नियमित गस्त वाढवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेऊन पोलिसांनी तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी भूमिका सौ. वैशालीताई खेडेकर यांनी मांडली. कारवाई न झाल्यास महिलांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून या टवाळखोरांचा बंदोबस्त करू, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.

“मुलींच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली. या निवेदनामुळे चिखली शहरातील शाळा, कॉलेज आणि क्लासेस परिसरातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

निवेदन देतेवेळी कपिल खेडेकर तसेच पोलीस उपनिरीक्षक लोखंडे उपस्थित होते.

📲 ताज्या बातम्यांसाठी WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

चिखली, बुलढाणा आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या स्थानिक बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.


👉 Join WhatsApp Group

📢 ही बातमी शेअर करा

चिखली आणि बुलढाणा जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील ताज्या स्थानिक बातम्या, पोलिस कारवाई, शिक्षण, प्रशासन आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी KattaNews.in वरील ताज्या बातम्या वाचा.

📰 Related News

MPSC पेपरफुटीचा धक्कादायक भांडाफोड; अवर सचिवासह 6 जणांना अटक, प्रेमभंगातून फुटला पेपर

रस्ता नसलेल्या गावाची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी; सर्पदंश झालेल्या गर्भवतीचा चार किलोमीटर झोळीतून अखेरचा प्रवास

‘दहा वेळा शून्य हा मोबाइल नंबर होऊ शकतो का?’ प्रश्न विचारला अन् शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप; जानेफळ पोलिसांत तक्रार

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

अंजनी खुर्द येथे ईद मिलाद निमित्त मदरशातील मुलांचा जुलूस

अंजनी खुर्दमध्ये ईद मिलादचा उत्साह; मदरशातील मुलांचा जुलूस अन् नात-कलिमाचे पठण

साखरखेर्डा येथे ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त रक्तदान करताना रक्तदाते

साखरखेर्डा येथे ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १४० जणांचे रक्तदान, हिंदू-मुस्लिम बांधवांनी जपली सामाजिक बांधिलकी

रस्ता नसल्याने सर्पदंश झालेल्या गर्भवतीला झोळीतून नेताना ग्रामस्थ

रस्ता नसलेल्या गावाची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी; सर्पदंश झालेल्या गर्भवतीचा चार किलोमीटर झोळीतून अखेरचा प्रवास

धाड आणि धामणगाव बढे तालुकानिर्मितीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे निवेदन

बुलढाण्यासाठी मोठी मागणी! धाड-धामणगाव बढे तालुकानिर्मितीसाठी ‘देवाभाऊं’कडे निवेदन; मुख्यमंत्री फडणवीसांचे सकारात्मक निर्णयाचे आश्वासन

हिवरा खुर्द येथे विद्यार्थ्याला शिक्षकाकडून मारहाण केल्याचा आरोप

‘दहा वेळा शून्य हा मोबाइल नंबर होऊ शकतो का?’ प्रश्न विचारला अन् शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप; जानेफळ पोलिसांत तक्रार

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजात पडक्या घरात अर्भकाचा मृतदेह

देऊळगाव राजात काळीज पिळवटून टाकणारी घटना! पडक्या घरात अर्भकाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ उकलण्याचे पोलिसांसमोर आव्हान

Leave a Comment