बुलढाणा | ३१ जानेवारी २०२६
मात्र धीर देणारा तो आधारवडच दादांच्या रूपाने अचानक निघून गेला. माझ्या राजकीय जीवनाचा कणा असलेले, मार्गदर्शक आणि बापासारखी माया करणारे दादा आज आपल्यात नाहीत, ही घटना अजूनही मनाला पटत नाही, असं सांगताना अॅड. काझी भावुक झाले.
अजित दादांच्या जाण्यामुळे मातृतीर्थ सिंदखेडराजाची अपरिमित हानी झाली आहे. दादा हे शब्दाचे पक्के होते. जे बोलले ते करून दाखवणं हेच त्यांचं राजकीय जीवन राहिलं आहे. सिंदखेडराजाच्या विकासासाठी आम्ही पाहिलेली स्वप्नं प्रत्यक्षात उतरायला सुरुवात झाली होती.
दादा सात ते आठ तास प्रत्यक्ष सिंदखेडराजात उपस्थित राहत होते. त्यामुळे विकासाचा मार्ग मोकळा झाला होता, विकास आराखड्याला स्पष्ट दिशा मिळाली होती. मात्र त्यांच्या अकाली निधनामुळे केवळ सिंदखेडराजाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठीच ही न भरून निघणारी हानी असल्याचं अॅड. नाझेर काझी यांनी नमूद केलं.
👉 अशाच राजकीय, सामाजिक आणि थेट ग्राउंड रिपोर्टिंगसाठी Kattanews.in नियमित वाचा.
संबंधित बातम्या













