हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

गाव वेशीला टांगलं! आदर्श ग्राम म्हणून गौरवलेल्या धानोरा-निमखेडा-बुट्टा ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा भडका

On: February 7, 2026 6:08 AM
Follow Us:
धानोरा निमखेडा बुट्टा आदर्श ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरण
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

सिंदखेडराजा | ५ जानेवारी २०२६

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील धानोरा, निमखेडा व बुट्टा या गट ग्रामपंचायतीतील काही विकासकामांबाबत अनियमितता झाल्याच्या तक्रारी युवकांनी केल्या आहेत. या संदर्भात युवकांनी गटविकास अधिकारी सिंदखेडराजा यांच्यामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून संबंधित कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गावातील काही योजनांच्या अंमलबजावणीत प्रत्यक्ष परिस्थिती व कागदोपत्री नोंदी यामध्ये तफावत असल्याचा संशय आहे. अंगणवाडी केंद्र, पाणीपुरवठा व्यवस्था, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन तसेच इतर विकासकामांबाबत योग्य तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, काही कामांची अंमलबजावणी अपेक्षेप्रमाणे झालेली नसून, यासंबंधी तांत्रिक व प्रशासकीय चौकशी आवश्यक असल्याचे युवकांचे म्हणणे आहे. संबंधित कामांच्या खर्चाबाबत पारदर्शक माहिती उपलब्ध करून देण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

माहिती अधिकार कायद्यान्वये मागविण्यात आलेली माहिती अद्याप प्राप्त न झाल्याचा उल्लेख करत, नियमाप्रमाणे माहिती देण्यात यावी अन्यथा राज्य माहिती आयोगाकडे दाद मागण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

ग्रामसभेच्या कार्यपद्धतीबाबतही काही मुद्द्यांवर ग्रामस्थांनी आक्षेप नोंदवला असून, सर्व प्रक्रिया नियमांनुसार पार पाडाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

या विषयावर संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन वस्तुनिष्ठ चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थ व युवकांकडून करण्यात येत आहे. चौकशीअंती सत्य परिस्थिती समोर यावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

📢 आपल्या गावातील भ्रष्टाचार, गैरप्रकार, पुरावे किंवा फोटो Kattanews.in कडे पाठवा. सत्य जनतेपर्यंत पोहोचवूया.


 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment